पुणे - जुनी सांगवीतील तुंबलेला कचरा उचलला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीत गेली चार दिवसांपासुन तुंबलेला कचरा आरोग्य विभागाकडुन उचलण्यात आल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. सर्वात प्रथम सकाळने कचरा समस्येकडे लक्ष वेधले होते.

यात्रा उत्सव काळात काही ठिकाणी कचरा गाड्या न आल्याने कुंड्यामधुन कचरा तुंबला होता. याबाबत सोमवारी (ता.२६) सकाळ मधुन सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. याची दखल घेत नगरसेवकांनी आरोग्य विभागास फैलावर घेत येथील शिंदेनगर, पवारनगर, पी.डब्ल्यु.डी. कर्मचारी वसाहत, पवनानगर घाट, आनंदनगर दत्तमठ येथील कचराकुंड्या व परिसराची स्वच्छता करण्यात आली.

जुनी सांगवीतील पवनाघाटावरील गोळा केलेला कचरा पालिका कर्मचाऱ्यांनी उचलण्याऐवजी जाळला अशी बातमी सकाळ मधुन प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत आज आरोग्य निरिक्षक व प्रत्यक्ष काम करणाऱ्या सफाई कामगारांनी खुलासा केला. कामगार म्हणाले, आम्ही कचरा गोळा करून गाडीची प्रतिक्षा करत होतो. सुटी झाल्याने आम्ही घरी गेलो. त्यानंतर कुणीतरी अज्ञातांनी हा कचरा जाळला असल्याचा खुलासा केला. 

यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकु नये असे त्या त्या भागातील नागरीकांना आवाहन करून सुचना देण्यात येणार आहेत, असे आरोग्य निरिक्षक उद्धव डवरी यांनी सांगितले.
 
सध्या प्रभागातील कचरा स्वच्छतेसाठी मनुष्यबळ पुरेसे आहे. मात्र नविन टेंडर कार्यान्वित होईपर्यंत प्रभागात नविन कचरागाड्यांची प्रतिक्षा आहे.त्यानंतर कचऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगितले. 

Web Title: waste removed by health department in sangavi pune