पाचशे कोटींची थकबाकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मीटरने पाणीपुरवठा होणाऱ्या नळजोडधारकांकडून वसुली करण्यात अडचणी

पुणे - मीटरने पाणीपुरवठा होणाऱ्या नळजोडधारकांकडे तब्बल पाचशे कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे आढळून आले असून दुबार पाणीपट्टी, नादुरुस्त मीटर आणि घरगुती नळजोडसाठी मीटरच्या दराने पाणीपट्टी आकारल्याने थकबाकीचा आकडा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.   

थकबाकी वसूल व्हावी, यासाठी पाहणी करून नळजोड दुरुस्त करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र नळजोड दुरुस्ती आणि त्याची पाणीपट्टी वसूल करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधितांकडून पाणीपट्टी भरण्यात येत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मीटरच्या दुरुस्तीसाठी मोहीम राबवून पाणीपट्टी वसूल करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित खात्याला दिल्या होत्या; मात्र त्या दृष्टीने पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही पाणीपट्टी वसूल होण्याची शक्‍यता कमी आहे. 

पाणीपट्टीची थकबाकी पाचशे कोटी रुपये असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र खूप कमी थकबाकी आहे. ती वसूल करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, त्यासाठी नळजोड, त्याचे स्वरूप आणि सध्याच्या वापराची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर स्वतंत्र मोहीम राबवून नेमकी थकबाकी किती आहे, याचा शोध घेण्यात येईल.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

दुबार पाणीपट्टी आणि मीटर नादुरुस्त असल्याने ही पाणीपट्टी वसूल होत नसल्याचे स्पष्ट
काही भागांत मीटरचा वापर होत नसतानाही त्यांना मीटरच्या दरानुसार पाणीपट्टी आकारणी
शहर आणि उपनगरांत ४२ हजार ७०३ नळजोडांना मीटरद्वारे पाणीपुरवठा त्यानुसार पाणीपट्टी आकारणी 
नळजोडधारकांकडे सुमारे ४९४ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी

Web Title: water bill 500 crore arrears