जलवाहिनीच्या कामामुळे पुणे पूर्व भागातील पाणी पुरवठा विस्कळीत

दांडेकर पूल येथे पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राकडे जाणाऱ्या १६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे.
water supply close
water supply closesakal
Summary

दांडेकर पूल येथे पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राकडे जाणाऱ्या १६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे.

पुणे - दांडेकर पूल येथे पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राकडे जाणाऱ्या १६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. ही गळती रोखण्यासाठी महापालिकेने रविवारी (ता. १६) जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. मात्र, यामुळे संपूर्ण हडपसर, लष्कर, कोंढवा भागातील पाणी पुरवठा विस्कळित होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्रात १६०० मिमी व्यासाची जलवाहिनी जाते. ती खराब झाल्याने दुरुस्त केली जाणार आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून कॅनॉलमधून पाणी सोडले जाणार आहे. ते लष्कर जलकेंद्रात घेऊन शुद्धीकरण केले जाईल, त्यामुळे पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार आहे. जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुमारे १४ तास चालणार आहे, त्यामुळे रविवारी दिवसभर काम केले जाणार आहे, असे पाणी पुरवठा प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

या भागात पाणी पुरवठा विस्कळित होणारा भाग पुढील प्रमाणे - बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, संपूर्ण हडपसर इंडस्ट्रिअल एरिया, मुंढवा, केशवनगर, माळवाडी, मगरपट्टा, सोलापूर रोड डावी बाजू, नंबर आकाशवाणी, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, ससाणेनगर, रामटेकडी इंडस्ट्रिअल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकरमठ, वैदुवाडी, आनंदनगर, रामनगर, वानवडी, साळुंके विहार, आझादनगर, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, सोलापूर रोड उत्तर बाजू. एस. व्ही.नगर, शांतिनगर, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, तरवडे वस्ती, कृष्णानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगावशेरी पार्ट, संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एन. आय. बी. एम. रोड, रेसकोर्स.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com