Water Issue : पाण्याची स्थिती चिंताजनक, बांधकामे काही महिने थांबवा - सुप्रिया सळे

पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी याचे योग्य नियोजन केले नाही तर अतिशय चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Supriya Sule
Supriya SuleSakal

पुणे - पुण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार असून, बैठकीमध्ये आमच्या अपेक्षेपेक्षा धक्कादायक माहिती प्रशासनाने दिली आहे. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी याचे योग्य नियोजन केले नाही तर अतिशय चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरात रोज नव्याने बांधकामांना परवानग्या दिल्या जात आहेत. प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे शहरातील बांधकामे काही महिन्यांसाठी थांबवा अशी मागणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्‍नावर सुळे यांनी आज महापालिकेत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये कचरा, पाणी, स्वच्छता, रस्ते, वारजे रुग्णालय यासह अन्य विषयांवर चर्चा झाली. त्यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके, काका चव्हाण उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘शहरातील कचरा, पाणी, स्वच्छता या समस्या गंभीर होत आहेत. आहे त्या स्थितीमध्ये सर्वांना पाणी देणे अवघड आहे असे प्रशासनच मान्य करत आहे. असे असताना शहरात नव्याने बांधकाम परवानग्या दिल्या जात असून, यासाठीच्या पाण्याचे नियोजन कसे करणार.

मी विकासाच्या विरोधात नाही, पण सध्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पाणी वापराचे नियोजन कसे असणार आहे याची माहिती आम्हाला द्यावी. अन्यथा आम्ही महापालिकेला घेराव घालू, असा इशारा सुळे यांनी दिला.

नागरिकांच्या अनेक अडचणी आहेत. शहरात गेल्या पाच सात वर्षापासून २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे, त्याचा फायदा होत नाही. गेल्या दोन वर्षापासून निवडणुका न झाल्याने महापालिकेत नगरसेवक नाहीत. राज्य सरकार आणि प्रशासन यांना नागरिकांचे छोटे प्रश्‍न सोडविता येत नाहीत. फक्त कोट्यावधी रुपयांचे मोठे प्रकल्प केले जात आहेत, अशी टीका सुळे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com