esakal | मोरेबाग, सावंत विहारमध्ये पाणीसंकट ; प्रशासनाचे दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

मोरेबाग, सावंत विहारमध्ये पाणीसंकट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज प्रभाग क्रमांक (४०) मधील सावंत गार्डन, मोरेबाग, सावंत विहारसह एकूण १० ते १५ सोसायट्या आणि आजूबाजूच्या परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पाणी आलेले नाही. तसेच मागील काही दिवासांपासून पाणी कमी दाबाने आणि कमी वेळ येणे तसेच अवेळी येणे, अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणांवर वाढल्या आहेत. अनेकदा टँकरही मागवावे लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

महापालिकेकडे तोंडी तसेच लेखी निवेदनाद्वारे तक्रार करुनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक रहिवाशी संतापले आहेत.पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनाही ही परिस्थिती सोसायट्यांच्या सदस्यांकडून वारंवार दाखविण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनीही ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रार केल्यानंतर दोन दिवस पाणीपुरवठा सुरळित होतो. मात्र, दोन दिवसानंतर परिस्थिती पुन्हा जशास तशी होते. सध्याच्या वेळी तर तीन-तीन दिवस पाणी येत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर याचा त्रास होत आहे. सातत्याने टँकरची वाट पाहणे, पाणी वेळेवर न येणे या गोष्टीमुळे वेळेचे व्यवस्थापन बिघडत असून नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा: "हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच..."

केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि नाकर्तेपणामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. आम्ही याचा खूप त्रास सहन करत आहोत. टँकरने पाणी मागवावे लागते. पाणीपुरवठा कर्मचारी लक्ष देत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे ते मुद्दाम असे करत आहेत काय असा प्रश्न पडतो

- अॅड. दिलीप जगताप, स्थानिक नागरिक.

या भागात अडचण असून त्याबाबतची तक्रार मिळाली आहे. कर्मचाऱ्यांकडून पाहणी चालू आहे. त्यामुळे या भागातील पाण्याची समस्या लवकरच सुटेल.

- प्रशांत कुंभार, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

loading image
go to top