इंदापूर तालुक्यात पाणी संकट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

निमगाव केतकी - वरकुटे पाझर तलाव कोरडा पडल्याने निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. आठ दिवसांतून एक वेळ पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात हाल होत आहेत. अनेक जण एक हजार लिटर पाण्यासाठी तीनशे रुपये मोजत आहेत. पाऊस न झाल्याने परिसरात लवकरच टॅंकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्‍यता आहे. 

मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. मात्र, यंदा अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. सध्या तर पिण्याच्या पाण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

वरकुटे खुर्द पाझर तलावाखालील बाजूस निमगाव केतकीला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन योजना आहेत. सध्या तलाव आटल्याने विहिरीतून सकाळी एक आणि संध्याकाळी एक तास पाणी मिळत आहे. ते गावाला पुरेसे ठरत नाही. शेंडेमळा पाणी योजनेची विहीर ही बापूभाई नाला येथे आहे. नीरा डावा कालव्यास पाणी चालू होते, त्या वेळी येथील विहिरीचे पाणी गावठाणास देण्यात येत होते. त्यामुळे गावठाणातील लोकांना चार-पाच दिवसांतून एक वेळ पाणी मिळत होते. 

थकीत पाणीपट्टीमुळे... 
निमगाव ग्रामपंचायतीकडे थकीत पाणीपट्टी असूनही केवळ वीस हजार भरून दोन महिने पुरेल एवढे पाणी पालखीच्या वेळेस सोडले होते. पाऊस नसल्याने सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पिकांसाठी पाण्याची मोठी मागणी आहे. या आवर्तनात तलावात पाणी सोडण्याचे नियोजन नव्हते. शेटफळ तलावाच्या फिडिंगच्या वेळेस पाणी सोडण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार होईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून वरकुटे तलावात पाणी सोडण्यात यावे, या साठी पाटबंधारे खात्याच्या सर्व कार्यालयात पत्र दिले होते. पाऊसही नाही व कालव्यातूनही पाणी न सोडल्याने हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 
- सुनील पवार, ग्रामविकास अधिकारी.

Web Title: Water Disaster in Indapur Tahsil