'पाणीदान' उपक्रमातून हजारो पक्ष्यांना मिळतेय जीवनदान

water donation initiative in pune is effectively working for save birds life
water donation initiative in pune is effectively working for save birds life

सहकारनगर (पुणे) : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय... त्यामुळे पाण्याच्या शोधात पक्षी कासावीस होऊन भटकंती करत सुटले आहेत. कुठे पाणीसाठा, पाणवठा मिळेल तिथे विसावा घेत आहेत. अशा पक्ष्यांची पाण्याची तहान भागविण्यासाठी फक्त एक एसएमएस करा आणि मोफत घरपोच पाण्याचे भांडे मिळवा हा उपक्रम आधारवड ठरत आहे. 

गेल्या सहा वर्षांपासून उन्हाळ्याच्या काळात सहकारनगर परिसरात पक्ष्यांसाठी 'पाणीदान'चा उपक्रम राबविला जात आहे. माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबिवला जात आहे. उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने तडफडून प्राण सोडणाऱ्या हजारो पक्ष्यांना वाचविण्यासाठी ही चळवळ उभी करण्यात आली आहे. पक्ष्यांसाठी कुंभाराकडून खास मातीचे भांडे बनवून घेण्यात येते. परिसरात जनजागृतीसाठी पत्रकांचे वाटप करून घरालगत, टेरेसवर पक्ष्यांना पाणी ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. भांडे देण्यासाठी एक एसएमएस करा आणि मातीचे भांडे मोफत घरपोच देण्याची संकल्पना राबविली जात आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे आठ हजार मातीची भांडी वाटण्यात आली आहेत. 

अमित बागुल, सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी यांनी नुकतीच शिवदर्शन येथील श्री गीता सोसायटीचे चेअरमन राजेंद्र शाह, आर. व्ही. कामत, डॉ. अविनाश भूतकर, अशोक तिखे यांना घरपोच भांडी दिली. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 
उपक्रमात सहभागी होण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा- 9822232322

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com