मोरया गोसावी मंदिरात शिरले पुराचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिराच्या परिसरात पुराचे पाणी शिरले. ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

पिंपरी - चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिराच्या परिसरात पुराचे पाणी शिरले. ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

बुधवारी (ता. १०) दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पवना नदीला पूर आला. चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे मोरया गोसावी समाधी मंदिराच्या सीमाभिंतीची उंची वाढविण्यात आली आहे. मात्र, मंदिराच्या परिसरात खालच्या भागातून पुराचे पाणी आत शिरले. सकाळी साडेसहाच्या सुमारास मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी आले होते. तर, दहा वाजेपर्यंत या पायऱ्यांपासून विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरापर्यंत पाणी कमी झाले होते. मंदिरात जाण्यासाठी लोखंडी जिन्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे काही भाविकांनी जिन्यावरून उतरून ‘श्रीं’चे दर्शन घेतले. 

पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मजवळील बंधारा सुमारे दहा वर्षांपूर्वी फोडण्यात आला होता. त्यानंतर पुराच्या पाण्याची तीव्रता कमी झाल्याचे स्थानिक नागरिक संजय कुलकर्णी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water of the floods in the Morya Gosavi Temple

टॅग्स