यात्रेकरुंची तहान भागवण्यासाठी सरसावले 'जल'दाते
शिर्सुफळ : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील श्री शिरसाई देवी यात्रेच्या दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी येथीलच श्री शिरसाई विद्यालयाच्या सन 2000 च्या बँचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत यात्रेकरुंची तहान भागवण्यासाठी पुढे सरसावले. यात्रेच्या काळात दोन दिवस मोफत थंडगार पाणी वाटप केल्याने यात्रेकरु सुखावले.

रामती तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द असलेल्या शिर्सुफळ येथील श्री शिरसाई देवीची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर येथील श्री शिरसाई विद्यालयाच्या सन 2000 च्या बँचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे ठरवले. यानुरुप यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकभक्तांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यामध्ये यात्रेच्या दोन्ही दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी थंडगार पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे उद्घाटन गावचे सरपंच अतुल हिवरकर, बारामती तालुका दुध संघाचे संचालक अँड.नितीन आटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल खोमणे, किशोर मेरगळ, निलेश शिंदे, महेंद्र हिवरकर, विलास शिंदे, मेजर निलेश आटोळे, शशिकांत म्हेत्रे, तुळशीदास म्हेत्रे, विनोद गुळुमकर, अनिल हिवरकर, महेश पानसरे, रविंद्र भगत, सुहास कांबळे, मेजर आप्पा हिवरकर, गणेश शिंदे, संतोष आटोळे यांच्यासह सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.माजी विद्यार्थी संघाच्या या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले.