भामा आसखेड धरणातून विसर्ग वाढविला; नागरिकांना सावधानतेचा इशारा

भामा आसखेड(ता.खेड) धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या धरणाच्या चारही दरवाजातून ६९७९ क्युसेसने विसर्ग सुरू आहे.
Bhama Askhed Dam
Bhama Askhed DamSakal
Summary

भामा आसखेड(ता.खेड) धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या धरणाच्या चारही दरवाजातून ६९७९ क्युसेसने विसर्ग सुरू आहे.

आंबेठाण - भामा आसखेड(ता.खेड) धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या धरणाच्या चारही दरवाजातून ६९७९ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. त्यासाठी धरणाचे दरवाजे दोन फुटांनी वर उचलण्यात आले आहे.धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने विसर्ग कमी जास्त केला जात आहे.सद्या सुरू असलेले पावसाचे प्रमाण पाहता विसर्ग वाढवावा लागू शकतो त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

खेड, शिरूरसह पुणे महानगरपालिकेला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात सध्या ९९.२३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ९९.८० टक्के पाणीसाठा होता. भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून आज सकाळी सहा पर्यंत १०८५ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ८.०८ टीएमसी म्हणजे ९९.२३ टक्के असून उपयुक्त पाणीसाठा हा ७.६१ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ९९.८० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

पावसाचे प्रमाण असेच राहिले तर धरणातून विसर्ग अजून वाढवावा लागेल अशी माहिती भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे, शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख आणि कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com