पश्‍चिम महाराष्ट्रात धरणांनी गाठला तळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

यंदा मॉन्सून लांबणीवर पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. ३० धरणांमध्ये दहा टक्‍क्‍यांहून कमी, तर १६ धरणांत शून्य टक्‍के पाणीसाठा आहे.

पुणे - यंदा मॉन्सून लांबणीवर पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. ३० धरणांमध्ये दहा टक्‍क्‍यांहून कमी, तर १६ धरणांत शून्य टक्‍के पाणीसाठा आहे. त्यामुळे जून संपत आला तरी नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातील भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यातील धरणांमधील पाणीपातळी यंदा सरासरीपेक्षा खालावली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २३ ते २५ जूनदरम्यान वादळी पाऊस होईल. २६ जूननंतर पावसात खंड पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्वमोसमी पावसाने काही भागांत हजेरी लावली; परंतु दमदार पाऊस झालेला नाही. जमिनीत ओलावा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पावसानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

पाणीपातळी खोलवर गेल्याने बोअरवेलची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे पुणे विभागात ११९५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, घोड, नाझरे, टेमघर धरणांत शून्य टक्‍के, विसापूर ०.२ टक्‍के, कळमोडी ०.२५, चासकमान ०.२१, भामा आसखेड ०.६२, वडिवळे ०.३६, आंद्रा १ टक्‍का, पवना १.२६, मुळशी ०.०५, माणिकडोह ०.६०, वरसगाव ०.७८, पानशेत १.५२, खडकवासला ०.२६, गुंजवणी ६.८१, नीरा देवघर १.३९, भाटघर ४.३९, वीर ४.१६, उजनी धरणात उणे ८८१.९३ टक्‍के पाणीसाठा  आहे.

पुणे विभागातील  टॅंकरची स्थिती 
जिल्हा     टॅंकर
पुणे :     ३१५
सातारा :     २९४
सांगली :     २२१
सोलापूर :     ३६४
कोल्हापूर :     १ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level decrease in western maharashtra dam