शिरसाई उपसा योजनेतून घेतले ओढा खोलीकरणात पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

उंडवडी : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड व 'ग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' यांच्यावतीने ओढा खोलीकरण करण्यात आलेल्या ओढ्यात शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

उंडवडी सुपे परिसरात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. बहुतांशी विहीरी व कूपनलिका कोरड्या पडू लागल्या होत्या. या परिसरात पाऊस नसल्याने खरीप हंगाम देखील लांबणीवर गेला होता. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होवू लागला होता. या पार्श्वभूमीवर शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचे पाणी येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येत ओढ्यात सोडून घेतले. येथे गेल्या महिन्यात 'ग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' व 'सकाळ रिलीफ फंड' यांच्या वतीने ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 

येथील ओढा खोलीकरणाच्या कामासाठी पोकलेन मशिन व सकाळ रिलीफ फंडाकडून पोकलेन मशिनला डिझेल मिळावे. यासाठी ग्रामपंचायत व येथील तनिष्का गटाच्या वतीने ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार व जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार येथील काम गेल्या महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे.

येथील ओढ्यात पाणी सोडल्यामुळे पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच परिसरातील विहीरींना व कूपनलिकेला पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकरी चारा पिके व खरीप हंगामातील पिके घेणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

Web Title: Water in the lid area taken from Shirsai Yojna