राज्यातील जलव्यवस्थापनाला मिळणार ऊजाळा | Water Management | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील जलव्यवस्थापनाला मिळणार ऊजाळा
राज्यातील जलव्यवस्थापनाला मिळणार ऊजाळा

राज्यातील जलव्यवस्थापनाला मिळणार ऊजाळा

पुणे - महाराष्ट्रातील पाऊस, पाणी, जमीन, नद्या असा सर्वांगीण शास्त्रशुद्ध अभ्यास मांडणारे नरहर आपटे यांचे ‘महाराष्ट्रांतील पाणीपुरवठा’ हे पुस्तक लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुनर्प्रकाशित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांच्याकडे या पुस्तकाची प्रत मिळाली असून महाराष्ट्रातील पाण्याचा मूळ इतिहास, त्यामागे असणारे भूशास्त्र आणि विज्ञान असा परिपूर्ण अभ्यास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. त्यामुळेच कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस आदींनी हे पुस्तक पुनर्प्रकाशित करण्याचे ठरविले आहे.

हेही वाचा: बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरवात

विद्यापीठाच्या मुद्रणालयातून १९६० साली हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाकडून हे पुस्तक लिहिण्याची सूचना नरहर आपटे यांना। करण्यात आली होती, त्यानुसार हे पुस्तक त्यावेळचे अनेक संशोधनपर अभ्यास, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील अभ्यासाचे संदर्भ देत लिहिण्यात आले आहे. डॉ. चाकणे म्हणाले, या पुस्तकात महाराष्ट्रातील पाण्याचा मूळ स्रोत, ते साठवण्यामागचं शास्त्र, जमिनीचा प्रकार, नद्या, नद्यांचे क्षेत्रफळ, तलाव, शेती, विहिरी अशी सर्व माहिती आकडेवारीसह प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पाण्याबाबतची जवळपास संपूर्ण प्राथमिक माहिती या पुस्तकात आहे. भूगर्भशास्त्राचा प्राध्यापक म्हणून महाराष्ट्रातील ही अनेक वर्षे जुनी माहिती, संदर्भ लोकांसमोर यावे असे वाटते, म्हणून या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

loading image
go to top