तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी पोहचले पाणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

तब्बल दहा वर्षांची प्रतिक्षा असलेल्या १६ कोटींच्या शिक्रापूर पाणी योजनेचे पाणी अखेर आज शिक्रापूरात पोहचले. चाचणी म्हणून पोहचलेल्या आजच्या पाण्याचे पुजन ग्रामस्थांचे वतीने सर्व महिला पदाधिका-यांनी केले तर या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वार्डात लाडू वाटून हा आनंदोत्सव साजरा केला.

शिक्रापूर - तब्बल दहा वर्षांची प्रतिक्षा असलेल्या १६ कोटींच्या शिक्रापूर पाणी योजनेचे पाणी अखेर आज शिक्रापूरात पोहचले. चाचणी म्हणून पोहचलेल्या आजच्या पाण्याचे पुजन ग्रामस्थांचे वतीने सर्व महिला पदाधिका-यांनी केले तर या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वार्डात लाडू वाटून हा आनंदोत्सव साजरा केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमिवर शिक्रापूरात नवीन पाणी योजना हवी म्हणून दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. सुरवातीला राष्ट्रीय पेयजल योजनेतून प्रस्तावीत झालेली ही योजना पुढे मुख्यमंत्री पेयजल योजनेत वर्ग झाली व सुमारे १६ कोटींच्या या योजनेसाठी कोंढापूरी (ता.शिरूर) येथील तलावातून पाणी योजना मंजुर झाली. या योजनेत एकुण ३५ किलोमिटर पाईपलाईनचे काम समाविष्ट असून त्यातील गावठाणांतर्गत पाईपलाईनचे काम वगळता कोंढापूरी ते शिक्रापूर तसेच दोन ठिकाणच्या पाणी टाक्यांच्या दरम्यानचे अंतर अशा एकुण २६ किलोमिटर पाईप लाईनचे काम नुकतेच पूर्ण झाले.

खडकवासला धरणातून 9 हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या गावांना इशारा

या योजनेचे पाणी गावात आज पोहचले व त्याची चाचणी व पाण्याचे पाणीपुजन सररपंच हेमलता राऊत यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, उपसरपंच जयश्री दोरगे यांच्यासह सर्व महिला पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी सरपंच रामभाऊ सासवडे, जयश्री भुजबळ, राजाभाऊ मांढरे, नवनाथ सासवडे, रोहीणी गिलबीले, माजी उपसरपंच सागर साईकर, भगवानराव वाबळे, त्रिनयन कळमकर, दत्ता गिलबीले आदींचे हस्ते गावात लाडू वाटण्यात आले. 

हे वाचा - खेड, शिरूरची चिंता मिटली, चासकमान धरणात एवढा साठा

दरम्यान १२.५ लाख लिटर व ३.५ लाख लिटरच्या पाण्याच्या दोन या योजनेतील नवीन टाक्यांसह जुन्या चार लाख लिटरच्या पाणी टाक्यांमुळे शिक्रापूरात आता लवकरच सुमारे दोन लाख लिटर पाणीटाकी एवढी पाणीसाठवण क्षमता गावची झाली असून प्रत्येक वस्ती व उपनगर येथील प्रत्येक घरांमध्ये स्वतंत्र नळयोजनेद्वारे हे पाणी वितरण लवकरच होणार असल्याची माहिती सरपंच हेमलता राऊत यांनी दिली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water reached this place after waiting for ten years