इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत उन्हाळी आवर्तनामुळे समाधान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

शेटफळगढे : जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर खडकवासला कालव्याला उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दुसरे आवर्तन आल्याने इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

जलसंपदा विभागाने यापूर्वी 24 मार्चला उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन सोडले होते. हे आवर्तन 12 एप्रिलला बंद झाले होते. मात्र, मे महिन्यातील वाढत्या उन्हाळ्यामुळे ऊस व इतर उन्हाळी हंगामातील पिके सिंचनाला आली होती. याशिवाय उन्हाळ्यामुळे विहिरी व कूपनलिका यांची पाणी पातळीही खालावलेली होती. त्यामुळे निव्वळ कालव्याच्या पाण्याचा आधार असलेली शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याच्या मार्गावर होती.

उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सिंचनासाठी तत्काळ सोडणे गरजेचे होते. या संदर्भात आमदार दत्तात्रेय भरणे यांनीही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी मे मध्येच शेती सिंचनासाठी पाणी तत्काळ सोडणे गरजेचे आहे, अशी आक्रमक भूमिका घेतली होती.

याची दखल घेत जलसंपदा विभागाने 17 मे पासून इंदापुरातील शेती सिंचनाला दुसरे आवर्तन सोडले आहे. त्यानंतर आमदार भरणे यांनी लगेचच पुण्यात 21 मेला या आवर्तनाच्या सिंचनाच्या नियोजनासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्‍यातील शेवटच्या सर्व सिंचित क्षेत्रांना पाणी देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Web Title: Water released for Indapur farmers