खडकवासला धरणातून विसर्ग बंद; पाणलोट क्षेत्रात पावसाने घेतली विश्रांती!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

खडकवासला प्रकल्पात सोमवारी सायंकाळ अखेर 29.13 टीएमसी (99.94 टक्के) उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध आहे.

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग सोमवारी (ता.26) बंद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. 

दसऱ्याला सोने-चांदीची अपेक्षेपेक्षा जास्त विक्री; पुण्यातील सराफांनी केला दावा​

खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही चारही धरणे पूर्ण भरली आहेत. खडकवासला प्रकल्पात सोमवारी सायंकाळ अखेर 29.13 टीएमसी (99.94 टक्के) उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी प्रकल्पात या तारखेस 28.34 टीएमसी (97.22 टक्के) पाणीसाठा होता. 

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पाऊस झाल्यानंतर 856 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यात वाढ करून बुधवारपासून तीन हजार 424 क्‍युसेकने विसर्ग सुरू होता.

'मुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे!'

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी: 
टेमघर - 3.69 (99.55) 
वरसगाव - 12.82 (100) 
पानशेत - 10.65 (100) 
खडकवासला - 1.97 (100) 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water resources department informed that discharge from Khadakwasla dam into Mutha river was stopped