'राष्ट्रीय पेयजल’मधून पुरंदरच्या 41 पाणीयोजनांना मंजुरी

श्रीकृष्ण नेवसे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सासवड, (जि.पुणे) : राष्ट्रीय पेयजल योजनेत पुरंदर तालुक्यातील ४१ पाणीयोजनांना मान्यता मिळाली आहे. जवळपास 50 हून अधिक गावे व १०० हून अधिक वाड्यावस्त्यांना यातून लाभ मिळण्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. ४३ कोटी २६ लाख रुपये खर्च याकरीता करण्यात येईल. 

सासवड, (जि.पुणे) : राष्ट्रीय पेयजल योजनेत पुरंदर तालुक्यातील ४१ पाणीयोजनांना मान्यता मिळाली आहे. जवळपास 50 हून अधिक गावे व १०० हून अधिक वाड्यावस्त्यांना यातून लाभ मिळण्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. ४३ कोटी २६ लाख रुपये खर्च याकरीता करण्यात येईल. 

पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने याकामी निधीची तरतूद केलेली असून जीवन प्राधिकरण आणि जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून या योजना मार्गी लावल्या जातील, असेही शिवतारे म्हणाले. शिवतारे म्हणाले, १ कोटीपेक्षा जास्त खर्चाच्या योजनांसाठी तांत्रिक छाननी शासन स्तरावर सुरु करण्यात आलेली आहे. १ कोटीपेक्षा कमी किमतीच्या योजनांची तांत्रिक तपासणी मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे समितीपुढे करण्यात येईल. समाविष्ट गावातील किमान उदभवांचे काम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.     

पंचायत समिती गण व गावनिहाय मंजूर पाणीयोजना पुढीलप्रमाणे..

* दिवे गण - आंबोडी ३३ लाख ९६ हजार, सिंगापूर ६४ लाख ४६ हजार, टेकवडी ८४ लाख २५ हजार, उदाचीवाडी  ४४ लाख ०४ हजार, वनपुरी ५६ लाख ३६ हजार, झेंडेवाडी ७८ लाख ३५ हजार * गराडे गण - भिवरी १ कोटी २६ लाख १४ हजार, चांबळी १ कोटी ३१ लाख २८ हजार, गराडे (दरेवाडी) ६२ लाख १३ हजार, कोडीत बु. १ कोटी ७९ लाख ८३ हजार, कोडीत खु .६० लाख ८५ हजार, सोमुर्डी  ५७ लाख ५५ हजार * बेलसर गण - बेलसर १ कोटी ९५ लाख ४० हजार, खळद  १ कोटी १५ लाख, पिसर्वे (कडबानवस्ती) १ कोटी ९६ लाख ४१ हजार, रानमळा ३७ लाख ८७ हजार, शिवरी १ कोटी ३५ लाख ०६ हजार, तक्रारवाडी २४ लाख ५७ हजार, वाळूंज  ६० लाख ९७ हजार * माळशिरस गण - माळशिरस (गायकवाडवस्ती) १ कोटी, नाझरे सुपे ७८ लाख ९८ हजार, पांडेश्वर(रोमणवाडी) ९९ लाख २२ हजार, पिंपरी (चिंचेचामळा) १ कोटी १३ लाख ५० हजार * भिवडी गण - बहिरवाडी (कोंडकेवाडी) ३८ लाख ८१ हजार, बहिरवाडी ३२ लाख ६० हजार, केतकावळे (कुंभोशी) १७ लाख ४३ हजार, खेंगरेवाडी १३ लाख ६३ हजार, पिंपळे ८५ लाख ४० हजार.

हरगुडे (नवीन हरगुडे) २७ लाख ४९ हजार * वीर गण - पिलाणवाडी २ कोटी ०५ लाख ७४ हजार, मांडकी १ कोटी ९५ लाख ०६ हजार, वीर (समगीरवाडी) १ कोटी २४ लाख ०३ हजार * कोळविहीरे गण - गुळुंचे ९५ लाख, मावडी क. प.१ कोटी १९ लाख ११ हजार, साकुर्डे १ कोटी ११ लाख ९२ हजार, राख २ कोटी ६० लाख ०८ हजार * निरा गण - निरा शिवतक्रार १ कोटी ६१ लाख ९० हजार, निराशिवतक्रार (काळेवाडी) ९२ लाख ८१ हजार, पिंपरे खु. व थोपटेवाडी १ कोटी १३ लाख ५० हजार,  वाल्हा (आडाचीवाडी) २ कोटी ४७ लाख ९३ हजार, वाल्हा २ कोटी ४७ लाख ९३ हजार.

Web Title: Water Scheme Got Sanctioned in Purandar