पुणे : धरणांत पाणीसाठा असूनही पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

एकाच वेळी पाणी नसल्याच्या तक्रारी येतात, तेव्हा टॅंकरद्वारे पाणी देणेही अशक्‍य होते. जलवाहिन्यातील बिघाड दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही.
- ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेविका

पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी सोडवत आहोत. त्यासाठी पाहणी आणि आवश्‍यक ती कामेही करण्यात येत आहेत. त्यानुसार रहिवाशांना पाणी दिले जात आहे.
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

पुणे - सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांना जाब विचारल्यानंतर शिवाजीनगरमधील पाणीपुरवठा आठ दिवसांत सुरळीत करण्याचा आदेश देण्यात आला. मात्र तरीही पाणीपुरवठा विस्कळित होतो आहे. याचे कारण नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना कळू शकलेले नाही. संपूर्ण शहराला आठ महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणांत असूनही शिवाजीनगरमधील रहिवाशांना आणखी किती दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार, असा प्रश्‍न आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्यावर उपाय करीत आहोत. त्यामुळे सर्वत्र पुरेसे आणि वेळेत पाणी देण्यात येत आहे. मात्र ज्या काही भागांत वेळापत्रकानुसार पाणी मिळत नाहीत, तिथे सुधारणा करण्यात येतील, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांनी शनिवारी सांगितले. 

शिवाजीनगर भागातील विशेषत: प्रभात रस्ता, आपट रस्ता, डेक्कन, पोलिस वसाहत, गावठाणाच्या काही परिसरांत गेल्या सहा महिन्यांपासून अपुरे पाणी मिळत आहे, अशी रहिवाशांची तक्रार आहे. त्यावरून आंदोलन केलेल्या नागरिकांना काही दिवस टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. ते आता कमी झाल्याने पुन्हा पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर! वर्षाभरात पीएमपीला मिळणार 984 बसचा बूस्टर! 

सेनापती बापट रस्त्यालगतच्या लोकवस्तीत जेमतेम अर्धा तासही पाणी येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या भागांमधील नागरिकांची तक्रार घेऊन भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेवक आदित्य माळवे यांनी तत्कलीन आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. तेव्हा पुढच्या दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. सहा महिन्यांपासून आम्हाला पाणी मिळत नाही, हे सतत सांगूनही अधिकारी मात्र उपाय सुचविण्यापलीकडे काही करीत नसल्याची माळवे यांची तक्रार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water shortage in dam despite water storage