पुणेकरांसाठी खुशखबर! वर्षाभरात पीएमपीला मिळणार 984 बसचा बूस्टर! 

PMPML will receive 984 New bus In this year
PMPML will receive 984 New bus In this year

पुणे : पीएमपीसाठी नवे वर्ष लाभदायी ठरण्याची चिन्हे असून, या वर्षात सुमारे 984 बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यातील सुमारे 400 बस बीआरटी मार्गावर धावू शकतील, असे नियोजन पीएमपी प्रशासनाने केले आहे. नव्या बस दाखल होणार असल्या, तरी सुमारे 300 जुन्या बस बाद होणार आहेत. तरीही शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये पीएमपीच्या दररोज सुमारे दोन हजार बस धावतील. 

हरित लवादाचा पिंपरी महापालिकेला दणका: दिला 'हा' आदेश

पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे 2 हजार बस आहेत. मात्र, त्यातील 1500 बस दररोज मार्गावर धावतात. दोन्ही शहरांतील लोकसंख्या लक्षात घेतली, तर प्रवाशांसाठी किमान 3 हजार बस आवश्‍यक असल्याचे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टने (सीआयआरटी) पीएमपीला बजावले आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्या घेताना डिझेलवर धावणारी एकही बस विकत घ्यायची नाही, असे राज्य सरकारने पीएमपीला बजावले आहे, त्यामुळे सीएनजी अथवा इलेक्‍ट्रिक बस विकत घेण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे.

पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

नव्या बस घेण्यासाठी दोन्ही महापालिकांचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि संचालकांनी होकार दर्शविला आहे. त्याबाबचा ठराव पीएमपीच्या संचालक मंडळाने मंजूरही केला आहे. नव्या सर्व बस 12 मीटर लांबीच्या असतील, त्यासाठी चालक- वाहक घेण्याचीही प्रक्रिया पीएमपी प्रशासनाने सुरू केली आहे. नव्या बस दाखल होणार असल्या, तरी त्यांची सुरक्षितता जोपासण्यासाठी आगारांत विशेष काळजी घेण्यासाठी विविध सूचना सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी दोन्ही शहरांतील सर्व आगारांना दिल्या आहेत. बसची संख्या वाढल्यामुळे प्रवासी संख्या वाढून पीएमपीच्या रोजच्या उत्पन्नाची सरासरी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
अशा येणार बस 

- 440 सीएनजी बस - भाडेतत्त्वावर - मार्चअखेर 
- 44 सीएनजी बस - भाडेतत्त्वावर - एप्रिलअखेर 
- 150 इलेक्‍ट्रिक बस - अनुदानातून - डिसेंबरअखेर 
- 350 इलेक्‍ट्रिक बस - पीएमपीतर्फे विकत - पुढील वर्षी जानेवारीअखेर 


पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 

''पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस दाखल होण्यासाठी दोन्ही महापालिकांतर्फे ठरलेली आवश्‍यक ती आर्थिक मदत केली जाईल. बस खरेदीबरोबरच आगारांचे विकसन, जुन्या बससाठीचे सुटे भाग, बस थांब्यांची स्थिती, बसची स्वच्छता याकडेही प्राधान्याने लक्ष दिले जाईल.''
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com