पाणीप्रश्‍नी प्रशासन धारेवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली... जलसंपदा विभागाची दादागिरी का सहन करायची, पाण्याची गळती, चोरी नेमकी कुठे होते, असे प्रश्‍न उपस्थित करीत पाणीप्रश्‍नावर सत्ताधारी पक्षासह सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. 

कालवाफुटी आणि त्यानंतर पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणाजवळील पंप बंद केल्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सुमारे तीन तास या विषयावर चर्चा झाली. सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त करीत पाणीप्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. काही नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला. आयुक्तांनी केलेल्या खुलाशावर समाधान न झाल्याने गटनेत्यांची बैठक घेण्याचा, पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्याची सूचना सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केली. त्यानुसार बैठकही होणार आहे. 

शहराचा पाणीपुरवठा हा ठेकेदाराच्या हातात गेला आहे. पाणीप्रश्‍नावर पालकमंत्र्यांना घेराव घालण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 
चेतन तुपे, विरोधी पक्षनेते 

जलसंपदा विभागाची दादागिरी किती काळ सहन करायची. भामा आसखेड योजनेचा पाणीपुरवठा कोणी रोखला आहे हे देखील स्पष्ट झाले पाहिजे. 
डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर 

पुण्यातील पाण्याच्या वापरावरच चर्चा केली जाते; पण कालव्यातील गळती, महापालिकेच्या हद्दीच्या पुढे कालव्यातून होणारी पाणीचोरी आणि मुंढवा जॅकवेलमधील पाणी न उचलणे, ठिबक सिंचन सक्ती याविषयी कोणीच बोलत नाही. 
अरविंद शिंदे, कॉंग्रेस गटनेते 

जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यातील पाण्याच्या आकडेवारीतील तफावत स्पष्ट झाली पाहिजे. जायका प्रकल्पाचे 65 कोटी पाण्याचे बिल देण्याकरिता वर्गीकृत केले. हे पैसे दिल्यावर पुण्याला पुरेसे पाणी मिळाले पाहिजे. 
संजय भोसले, शिवसेना गटनेते 

Web Title: Water shortage in festival season