पुणे शहरात पाण्याचा ठणठणाट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

देखभाल-दुरुस्तीसाठी संपूर्ण शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारीही बहुतांशी भागांत अपुरा पाणीपुरवठा झाला; तर पेठांमधील काही भागांत सायंकाळीही पाणी आले नाही; परंतु महापालिकेने सर्वत्र पाणी सोडल्याचा दावा केला. त्यामुळे नागरिकांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला असून ऐन पावसाळ्यातील पाणी कपात केल्यामुळे ते संतप्त झाले आहेत.

पुणे - देखभाल-दुरुस्तीसाठी संपूर्ण शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारीही बहुतांशी भागांत अपुरा पाणीपुरवठा झाला; तर पेठांमधील काही भागांत सायंकाळीही पाणी आले नाही; परंतु महापालिकेने सर्वत्र पाणी सोडल्याचा दावा केला. त्यामुळे नागरिकांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला असून ऐन पावसाळ्यातील पाणी कपात केल्यामुळे ते संतप्त झाले आहेत.

शहरला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्याने नागरिकांना पुरेसे पाणी देण्याचे नियोजन केले आहे, असे महापालिकेने यापूर्वीच सांगितले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागांत अपुरे पाणी येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या जलकेंद्रांतील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर शुक्रवारी अपुरा आणि उशिराने पाणीपुरवठा होईल, असे सांगितले होते. मात्र, बहुतांशी भागातील परिस्थिती उलट होती. 

कसबा पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ, नाना पेठ आणि भवानी पेठांच्या बहुतांशी भागात पाणी आले नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage in Pune City