पुणे जिल्ह्यात 57 टॅंकरने पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पुणे - पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील 391 गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. पाच जिल्ह्यांमधील 391 गावांतील 2 हजार 350 वाड्यावस्त्यांना 361 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्यांमधील पाणी टॅंकरच्या मागणीने 350चा टप्पा पार केला आहे. 

पुणे जिल्ह्यात सध्या 57 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ पाणीपुरवठा योजनाची दुरुस्ती, विंधन विहिरी घेणे, हातपंप दुरुस्त करणे, तलावांमध्ये पाणी सोडणे अशा उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. पाच जूनपर्यंत धरणातून पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. यंदाचा मॉन्सून लांबला, तर पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ शकते. यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

जिल्ह्यातील आकडेवारी 
पुणे जिल्ह्यातील बारामती 14, पुरंदर 13, आंबेगाव 10, भोर 2, जुन्नर 5, दौंड 2, खेड 3, इंदापूर 2, शिरूर 2, वेल्हा 3 आणि हवेली 1 असे 57 टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

Web Title: Water supply by 57 tankers in the pune district