भोसरी परिसरातील पाणीपुरवठा आज बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

पिंपरी - जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी भोसरी गावठाणासह इतर परिसरात पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २०) सकाळी दहानंतर बंद ठेवला जाणार आहे. शनिवारी (ता. २१) पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्‍यता असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

प्राधिकरणातील पेठ क्र. २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून भोसरीपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीमधून भक्ती-शक्ती चौकात गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. २०) तेथे दुरुस्ती काम केले जाणार आहे. या कालावधीत जलवाहिनीमधून पाणी पंपिंग होणार नसल्याने दिघी, बोपखेल, दिघी मॅगझीन, चक्रपाणी वसाहत, पेठ क्र.१, हवेली हॉटेल परिसर इत्यादी तसेच मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, इंद्रायणीनगर, पेठ क्र. ६, जय गणेश साम्राज्य, गंधर्वनगरी आदी भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे, असे पालिकेच्या ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

Web Title: water supply close in bhosari area