शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पुणे - जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे कळसचा काही भाग, धानोरी, मुंजाबा वस्ती, लोहगाव, विमाननगर आणि विद्यानगरचा काही भाग, तसेच विश्रांतवाडी या परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 4) बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. 5) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे महापालिकेने कळविले आहे. 

होळकर जलकेंद्रातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा बदल होणार असून, त्याची नोंद घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: The water supply of the eastern part will be closed tomorrow

टॅग्स