जॅकवेलचा पॅनलबोर्ड जळाला; चार गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत

pune.jpg
pune.jpg

कोंढवे धावडे : शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर व न्यू कोपरे येथील पाणी योजनेच्या जॅकवेलमधील पॅनेल बोर्ड सोमवारी जळल्यामुळे या परिसरातील चार गावांचा पाणी पुरवठा उद्या मंगळवारपर्यंत विस्कळीत झाला आहे.

खडकवासला धरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचा जॅकवेल आहे. त्याला महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. आज सकाळी अचानक या ठिकाणचा वीजेचे व्होल्टेज अचानक वाढले. परिणामी जॅकवेल मधील विजेचा पॅनेल बोर्ड जळाला. यामुळे येथील वीज पुरवठा खंडित झाला. प्राधिकरणाचे उपअभियंता एन.पी. कुलकर्णी, शाखा अभियंता प्रवीण शेलार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्राधिकरणाच्या विद्युत विभागाला माहिती दिली. त्यानुसार खराब झालेले इलेक्ट्रिकल पार्ट आणून ते बसविले जाणार आहे. 

या योजनेतील शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर व न्यू कोपरे गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी 24 तास वीज पंप सुरू ठेवावा लागतो. सकाळी वीज पुरवठा बंद झाल्याने सकाळ पासून पाणी उचलले नाही. परिणामी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी न पोचल्याने नियमित होणारा आज संध्याकाळचा होणारा पाणी पुरवठा होणार नाही. रात्री उशीरा पर्यंत काम सुरू राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वीज पुरवठा पुरवत झाल्यानंतर उद्या पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात येईल. 

जळालेल्या पॅनलबोर्ड तातडीने दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. आज संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. उद्या मंगळवारी सकाळी पाणी नेहमी प्रमाणे पुरवठा या दृष्टीने दुरुस्तीचे काम आज सोमवारी उशीरा पर्यंत काम सुरू राहील.
- प्रवीण शेलार, शाखा अभियंता

खडकवासला धरण : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचा जॅकवेलचा सोमवारी विजेचा व्होल्टेज वाढल्याने पॅनेल बोर्ड जळल्यामुळे शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर व न्यू कोपरे येथील पाणी पुरवठा उद्या मंगळवारपर्यंत विस्कळीत झाला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com