
देखभाल दुरुस्तीचे कामे केली जाणार असल्याने शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या (ता. ५) बंद राहणार आहे.
पुण्यातील या भागातील पाणी पुरवठा उद्या राहणार बंद
पुणे - वडगाव जलकेंद्र (Vadgaon Water Center) आणि विमान नगर व धानोरी टाकी अवलंबून असणार्या भागात विद्युत आणि पंपींग, स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामे (Repairing Work) केली जाणार असल्याने शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा (Water Supply) उद्या (ता. ५) बंद (Close) राहणार आहे.
शुक्रवारी (ता. ६) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, असो पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग - वडगाव जलकेंद्र परीसर हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.
भामा आसखेड प्रकल्प - विमाननगर टाकी परिसर - संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एस.आर.ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुना नगर, दत्त मंदिर परिसर इ.
धानोरी टाकी परिसर - कमल पार्क, माधव नगर ,धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी नगर, गोकुळ नगर, भैरवनगर, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर, सिद्धार्थ नगर, सुदामा नगर, अंबानगरी, हरिकृष्ण पार्क, इ.
जनसंपर्क विभागाचा ढिसाळ कारभार
शहरातील पाणी गुरूवारी बंद असणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सोमवारी (ता. २) जनसंपर्क विभागाला अधिकृत कळविले होते. पण जनसंपर्क विभागाने ही माहिती बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे पाणी बंद असल्याची पूर्वसूचना नागरिकांना उशीरा मिळाल्याने जनसंपर्क विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
Web Title: Water Supply In This Area Of Pune Will Be Closed Tomorrow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..