पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून दिवसाआड पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

टाक्‍या बांधण्याचे आवाहन
एकदा नळाला पाणी आल्यानंतर ते दोन दिवस पुरेल इतक्‍या साठवण क्षमतेच्या टाक्‍या नागरिकांनी बांधून घ्याव्यात. तसेच उपलब्ध पाणी जपून वापरावे, टाक्‍या भरून वाहू देऊ नये, जुन्या टाक्‍या दुरुस्त करून त्यांतून होणारी गळती थांबवावी, नळ, पाइप यांचीही दुरुस्ती करून घ्यावी. पाणी गळती व चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनला कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पिंपरी - निगडी सेक्‍टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात दररोज उपलब्ध पाण्याचे समसमान वितरण करण्यासाठी शहरात सोमवारपासून (ता. २५) दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. वेळापत्रकानुसार सोमवारी शहराच्या अर्ध्या भागात तर मंगळवारी उर्वरित अर्ध्या भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी सध्या मावळातील पवना धरण एकमेव जलस्त्रोत आहे. सध्या धरण शंभर टक्के भरलेले आहे. मात्र, महापालिकेच्या पाणी उचलण्याची क्षमता संपलेली आहे. निगडी-प्राधिकरण सेक्‍टर २३ मधील जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ५४० दशलक्ष (एमएलडी) लिटर आहे. सध्या पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून ४८० एमएलडी अशुद्ध जलउपसा केला जात आहे. तिथेच एमआयडीसीचेही अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज म्हणून महापालिका एमआयडीसीकडून दररोज ३० एमएलडी पाणी विकत घेत आहे. म्हणजचे महापालिका दररोज जास्तीत जास्त ५१० दशलक्ष लीटर पाणी उचलू शकते. यापेक्षा जास्त पाणी साठवण व शुद्धीकरण क्षमता महापालिकेच्या प्रकल्पाची नाही. सतत वाढणारे शहर, वाढती लोकसंख्या, पाण्याचा अतिवापर आणि पाणीगळती व चोरीचे ४० टक्के प्रमाण, यांमुळे शहराच्या बहुतांश नागरिकांना कमी दाबाने, अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या आठवड्यात घेतला. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रकही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे. 

या भागात आज पाणीपुरवठा बंद
किवळे, कोतवालनगर, भीमाशंकरनगर, दत्तनगर, रावेत गावठाण, भोंडवेनगर, पुनावळे, गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी, पेठ २९, ताथवडे, अशोकनगर, दळवीनगर, उद्योगनगर, संतोषनगर, गिरिराज कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, रस्टन कॉलनी, एसकेएफ सोसायटी, चिंचवडगाव, केशवनगर, श्रीधरनगर, सुदर्शननगर, विजयनगर, तानाजीनगर, भाटनगर, भीमनगर, भैरवनाथनगर, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव, भालेकरनगर, मोरया पार्क, प्रभातनगर, शिवराजनगर, गजानननगर, काटेपुरम, राजीव गांधीनगर, हिराबाई लांडगे झोपडपट्टी, जवळकर चाळ, शास्त्रीनगर, केशवनगर, गुलिस्तानगर, कृष्णानगर, समर्थनगर, कीर्तिनगर, गणेशनगर, सीएसई सोसायटी, आदर्शनगर, पीडब्ल्यूडी वसाहत, मधुबन, शितोळेनगर, शिक्षक सोसायटी, सातपुडा सोसायटी, मुळानगर, संगमनगर, पवनानगर, ममतानगर, सुंदरबाग, बॉम्बे कॉलनी, दापोडी गावठाण, जय भीमनगर, आनंदवन, दत्तनगर-थेरगाव, क्रांतिवीरनगर, जय मल्हार कॉलनी, शिवतीर्थनगर, भोरडेनगर, कस्पटेवस्ती, काळेवाडी फाटा, कावेरीनगर पोलिस वसाहत, पडवळनगर, पवारनगर, विनोदेवस्ती, काळाखडक, जगताप डेअरी, विशालनगर, पिंपळे निलख गावठाण, रक्षक सोसायटी, वाकड रोड, कलाटेनगर, सद्‌गुरू कॉलनी, ईएसआय, सेक्‍टर २५, २४, दत्तवाडी, आकुर्डी, काळभोरनगर, मोहननगर, गवळीनगर, इंदिरानगर, फुलेनगर, रामनगर, शंकरनगर, रामदासनगर, चिखली गावठाण, पाटीलनगर, महादेवनगर, शेलारवस्ती, बोऱ्हाडेवाडी, सेक्‍टर १६, मोरे पाटील चौक, देहू-आळंदी रस्ता, आल्हाटवस्ती, पवारवस्ती, कुदळवाडी, हरगुडेवस्ती, घरकुल, शिवतेजनगर, पूर्णानगर, शरदनगर, सुदर्शननगर, कोयनानगर, फुलेनगर, सेक्‍टर २०, कृष्णानगर, अजंठानगर, नेवाळेवस्ती, ताम्हाणेवस्ती, तळवडे गावठाण, रुपीनगर, आल्हाटवस्ती, सस्तेवस्ती, मोशी गावठाण, शिवतेजनगर, आदर्शनगर, तापकीरनगर, खानदेशनगर, गंधर्वनगरी, वाघेश्‍वरनगर, बनकरवस्ती, विनायकनगर, संजय गांधीनगर, बोराटेवस्ती, बोऱ्हाडेवाडी, भोसरी गावठाण, लांडेवाडी, दिघी गावठाण, विजयनगर, भारतमातानगर, सावंतनगर, परांडेनगर, कोतवालवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, चोविसावाडी, वडमुखवाडी, डुडुळगाव, दिघी मॅगझीन, डीताजणेमळा, गवळीमाथा, उद्यमनगर, वल्लभनगर, कासारवाडी, शंकरवाडी, कुंदननगर.

(टीप - या भागात मंगळवार, गुरुवार, शनिवार अशा पद्धतीने पाणीपुरवठा होईल.)

शहरात आज होणारा पाणीपुरवठा
विकासनगर, किवळे, कोतवालनगर, आदर्शनगर, दत्तनगर, उत्तमनगर, बापदेवनगर, मामुर्डी, साईनगर, इस्कॉन मंदिर परिसर, डीवाय पाटील कॉलेज रोड, शिंदेवस्ती, एसबी पाटील शाळा परिसर, लक्ष्मीनगर, म्हस्केवस्ती, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, शिवनगरी, 
बळवंतनगर, शिवाजी पार्क, रेलविहार, पिंपरी कॅम्प, भाटनगर, डीलक्‍स चौक, मिलिंदनगर, वाघेरे कॉलनी, एचबी ब्लॉक, तपोवन मंदिर, नवमहाराष्ट्र परिसर, बालामल चाळ, पिंपळे सौदागर गावठाण, केशवनगर, वैदूवस्ती, सुदर्शननगर, जवळकरनगर, प्रभातनगर, पवार वस्ती, नवभारतनगर, गुलाबनगर, श्रमिकनगर, जयभीमनगर, काटे चाळ, काची आळी, सिद्धार्थनगर, न्यू गुलाबनगर, रहाटणी, थेरगाव गावठाण, समता कॉलनी, संदीपनगर, विजयनगर, तापकीरनगर, नढेनगर, गजानननगर, शास्त्रीनगर, नखाते वस्ती लिंक रस्ता, कोकणे चौक, रामनगर, रहाटणी चौक, फाईव गार्डन सोसायटी, कुणाल आयकॉन, रोजवूड सोसायटी, कलाटेनगर, नंदनवन कॉलनी, कोस्टारिका, पलाश सोसायटी, वाकड, सद्‌गुरू कॉलनी, म्हातोबानगर, गणेशनगर, मंगलनगर, वेणुनगर, भूमकरवस्ती, पारखे वस्ती, माने वस्ती, जमदाडेवस्ती, सेक्‍टर २७, २७ अ, २८, २३, २६, निगडी गावठाण, सिद्धिविनायकनगरी, आकुर्डी गावठाण, विठ्ठलवाडी, श्रीकृष्णनगर, क्रांतिनगर, पंचतारानगर, संभाजीनगर, शाहूनगर, विवेकनगर, म्हेत्रेवस्ती राष्ट्रभूषण सोसायटी, मारुती मंदिर, बालघरे वस्ती, सुयोगनगर, पंतनगर, रुपीनगर, सेक्‍टर २१, २२, यमुनानगर, साईनाथनगर, पीसीएमसी वसाहत, गणेश सोसायटी, सम्राटनगर, निगडी गावठाण, लक्ष्मीनगर, साठे वसाहत, बुद्धनगर, राजनगर, सेक्‍टर चार, सहा, नऊ, सात व १०, भोसरी शीतलबाग, डोळस वस्ती, गव्हाणे वस्ती, आदिनाथनगर, रामनगर, जेपीनगर, गुळवे वस्ती, भगतवस्ती, शांतिनगर, इंद्रायणीनगर, बालाजीनगर, खंडोबामाळ, दिघी रस्ता, गवळीनगर, राधानगरी, सॅंडविक कॉलनी, रामनगरी, श्रीकृष्ण कॉलनी, बोपखेल, गणेशनगर, बौद्धनगर, रामनगर, चऱ्होली गावठाण, वाघेश्‍वरनगर, बुर्डेवस्ती, ताजणेवस्ती, सरपंच मळा, डीवाय पाटील कॉलेज, काटे कॉलनी, आझादनगर, दाभाडेवस्ती, दिघी दत्तनगर, गजानन महाराजनगर, गणेशनगर, डुडुळगाव, पांडवनगर, लांडगे वस्ती, सेक्‍टर एक, सद्‌गुरुनगर, फुलेनगर, रामनगर, राधाकृष्णनगर, हुतात्मा चौक, शास्त्रीचौक, महादेवनगर, महात्मा फुलेनगर, खराळवाडी, गांधीनगर, संत तुकारामनगर, स्वरगंगा, म्हाडा, नेहरूनगर, महेशनगर, फुगेवाडी, मध्य कासारवाडी, अजमेरा, मोरवाडी, लालटोपीनगर. 
(टीप : या भागात सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार अशा पद्धतीने पाणीपुरवठा होईल.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water supply issue in Pimpri-Chinchwad city