पुण्यात पाणीकपात आजपासून

पुण्यात पाणीकपात आजपासून

पुणे - शहराच्या काही भागांत पाणीकपात करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय सोमवारपासून (ता. १०) लागू होणार आहे. त्यानुसार वडगाव जलकेंद्रांतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत आठवड्यातून एक दिवस पाणी बंद राहील.

दरम्यान सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, कोंढवा (बु.), येवलेवाडी, आंबेगाव (खु.), सिंहगड रस्ता, आंबेगाव पठार, धायरी परिसरातील पाणीपुरवठा आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार वेळापत्रक तयार केले आहे.

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याचे नियोजन करीत असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पहिल्या टप्प्यात वडगाव जलकेंद्रातून ज्या भागांना पाणीपुरवठा होतो, तेथील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात  आला आहे. 

...असा राहील पाणीपुरवठा बंद
रविवार : सिंहगड रस्त्याचा काही भाग आणि धायरी.
सोमवार : आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसर.
मंगळवार : सिंहगड रस्त्याचा काही भाग.
बुधवार : सहकारनगर, धनकवडी गाव (स.क्र. १, २) बालाजीनगर.
गुरुवार : कात्रज गाव, गोकूळनगर, सुखसागरनगर.
शुक्रवार ः आंबेगाव (खु.), संतोषनगर इत्यादी.
शनिवार : कात्रज (काही भाग), कोंढवा (बु.), येवलेवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com