कोथरूड, बाणेर, बालेवाडीचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply

वारजे जलकेंद्राचे अखत्यारीतील गांधी भवन टाकी व चांदणी चौक (चौकोनी) टाकीचे मुख्य जलवाहिनीला फ्लो मीटर बसविणे व तदनुषंगिक कामाचे नियोजन असल्यामुळे पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार.

कोथरूड, बाणेर, बालेवाडीचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

पुणे - वारजे जलकेंद्राचे अखत्यारीतील गांधी भवन टाकी व चांदणी चौक (चौकोनी) टाकीचे मुख्य जलवाहिनीला फ्लो मीटर बसविणे व तदनुषंगिक कामाचे नियोजन असल्यामुळे पाणीपुरवठा गुरुवारी (ता.10) बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. 11) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

पुढीलप्रमाणे : गार्डन सिटी, कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुल नगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, शेरावती लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन ७ व ९, मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर.

पाषाण साठवण टाकी, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सँटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर