शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद 

शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद 

पुणे - महापालिकेच्या विविध पाणीपुरवठा केंद्र आणि पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून, त्यामुळे येत्या शुक्रवारी ( ता.7)) शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ( ता. 8) कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर-पंपिंग), रॉ वॉटर, एसएनडीटी या जलकेंद्रांमध्ये दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत; तसेच लष्कर जलकेंद्रात महावितरणतर्फे विद्युतविषयक कामे करण्यात येणार असल्याने या जलकेंद्रातून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो, तेथील पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी केले आहे. 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : 
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र 42, 43, कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टॅंकर भरणा केंद्र. 

एसएनडीटी विभाग : प्रभात रस्ता, एरंडवणा गावठाण, पटवर्धनबाग, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, करिष्मा सोसायटी, चतुःशृंगी परिसर, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर गावठाण, पुणे रेल्वे स्टेशन परिसर, रेव्हेन्यू कॉलनी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, शिवाजी हाउसिंग सोसायटी, वडारवाडी, पांडवनगर, भांडारकर रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता इत्यादी. 

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, रेसकोर्स, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com