नव्या उपनगरांमध्ये पाणी पोचणार; मुख्यमंत्र्याचे महापालिकेला आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांसह धायरी, शिवणे, उत्तमनगर भागात तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, असे आदेश मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला दिले. 

पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांसह धायरी, शिवणे, उत्तमनगर भागात तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, असे आदेश मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला दिले. 

धायरी येथील कालव्यातून होणाऱ्या पाणी चोरीचे प्रकरण सकाळने उघडकीस आणले होते. याबाबत विधान सभेत आमदार भीमराव तापकीर यांनी लेखी प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आदेश दिला. 

तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे देखील या गावांना सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकतो, असेही स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water supply in the will be smooth in suburb of pune