दुर्घटनेनंतरही पाण्याच्या टाक्‍या ‘जैसे थे’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

पुणे - पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने त्या खोलीला कुलूप लावले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍यांची दुर्दशा कायम आहे. तसेच स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारातील सरकता जिना (एस्कलेटर) बंद पडलेला आहे. एकूणच प्रवाशांच्या सुविधेचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे.

रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्यासाठी ९० हजार लिटर क्षमतेच्या तीन टाक्‍या मुख्य इमारतीवरील खोलीत बसविण्यात आलेल्या आहेत. यातील एका टाकीमध्ये नुकताच मृतदेह सापडला होता. त्या संदर्भात या टाक्‍यांची पाहणी केली असता. या टाक्‍या अत्यंत जुन्या आणि जर्जर झालेल्या आहेत. खोलीमध्ये अत्यंत अस्वच्छता आहे. या टाक्‍यांवर कोणतेही आवरण नसून त्यामध्ये कीटक, कचरा तसेच अन्य वस्तू पडण्याची शक्‍यता असते. त्याचबरोबर या टाक्‍या लोखंडी असून त्यांना गंज लागलेला आहे. संबंधित टाक्‍यांमार्फत स्टेशनवर येणाऱ्या हजारो प्रवाशांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. याबाबत प्रशासनास विचारले असता, संबंधित तिन्ही टाक्‍यांची स्वच्छता करण्यात आलेली असून, सुरक्षिततेसाठी टाक्‍या असलेल्या खोलीला कुलूप लावण्यात आले आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सरकता जिना बंद
गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सरकता जिना (एस्कलेटर) दुरुस्तीचे कारण देत बंद ठेवण्यात आला आहे. लवकरच तो सुरू करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, हा जिना बऱ्याच दिवसांपासून बंद असून त्याचा फायदा प्रवाशांना होत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

पाण्याच्या टाक्‍यांची स्वच्छता करून त्या खोलीला कुलूप लावण्यात आले आहे. प्रवाशांना स्वच्छ पाणी पुरविण्यात येत आहे. तसेच सरकता जिना जुन्या पद्धतीचा असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी बाहेरील कंपनीला बोलविण्यात येते. दुरुस्तीनंतर लवकरच तो सुरू करण्यात येईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Tank Issue Pune Railway Station