पुणे जिल्ह्यात टँकरचे द्विशतक

पुणे जिल्ह्यात टँकरचे द्विशतक

पुणे - जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आजअखेर १९६ टॅंकर सुरू झाले आहेत. शिवाय आणखी १०७ टॅंकरच्या मागणीचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. यामुळे जिल्ह्यात टॅंकरने द्विशतक गाठले आहे. सद्यःस्थितीत ११६ गावे आणि ९८८ वाड्या-वस्त्यांमधील सव्वातीन लाख लोकसंख्या ही तहानलेली आहे. दहा वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच टॅंकरच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. 

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३७ टॅंकर बारामती; तर सर्वांत कमी म्हणजे केवळ प्रत्येकी चार टॅंकर भोर व वेल्हे तालुक्‍यात आहेत. मावळ तालुक्‍यात अद्याप एकही टॅंकर सुरू झालेला नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी आज जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध जलस्रोत व पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा आणि पिण्याचे पाणी, चारा आणि जनावरांच्या पाण्याबाबत पाहणी करण्याचा आदेश सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे. 

पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एकूण टॅंकरपैकी १० शासकीय आणि १८६ खासगी टॅंकर असून, यापैकी २९ टॅंकर पुरस्कृत आहेत. टॅंकर भरण्यासाठी ५७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ही सर्व गावे आणि वाड्या-वस्त्यांसाठी मिळून दररोज ४१६ खेपा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात ४०४ खेपा पूर्ण होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com