पाणी चोरीप्रकरणी ३४ शेतकऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

सर्वसामान्य कोमात; पाणीचोर जोमात...
इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील नीरा डाव्या कालव्यातून दररोज सुमारे २०० क्‍युसेक पाण्याची चोरी होत आहे. यामुळे पश्‍चिम भागातील सर्वसामान्य छोट्या शेतकऱ्यांची पिके जळण्याच्या मार्गावर असून, छोटे शेतकरी पाण्याअभावी कोमात जाण्याची वेळ आली आहे. नीरा डाव्या कालव्यालगत विहिरी खोदून जलवाहिन्यांद्वारे पाणी चोरून नेणारे मोठे शेतकरी जोमात आहेत.

वालचंदनगर -  इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील बोरी, लासुर्णे, भरणेवाडी परिसरातील नीरा डाव्या कालव्याचा भराव फोडून बेकायदा सायफनद्वारे पाणी चोरी केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी ३४ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल पांडुरंग वायाळ, गणेश पोपट सांगळे, विजय आप्पा सांगळे, दीपक बन्याबा सांगळे, नितीन बापूराव सांगळे (सर्व रा. बिरंगुडी), रमेश नामदेव धायतोंडे, दत्तात्रेय कामाजी पोरे, बाळासो गोपीनाथ भरणे, अंबादास विठ्ठल भरणे, तानाजी तात्याराम भरणे, अनिल साहेबराव भरणे, नबाजी अंकुश भरणे, सचिन रामदास पोरे, भारत मारुती पोरे, बापू बाबा पोरे, विठ्ठल चंद्रकांत पोरे, बबन भागूजी गाढवे, नामदेव ठकोबा पोरे, दादा जगन्नाथ भरणे, महादेव सुभेदार पोरे (सर्व रा. भरणेवाडी), रमेश पांडुरंग शिंदे, मल्हारी विष्णू शिंदे, शशिकांत रामचंद्र धालपे, सतीश बाबा शिंदे, लक्ष्मण उत्तम जगताप, ज्ञानेश्‍वर नारायण शिंदे (सर्व रा. बोरी), बाळासो भगवान नरुटे, कुमार काशिनाथ म्हत्रे, भारत बिरा करे, अंबादास मारुती वाघमोडे, साहेबराव गोविंद वाघमोडे (सर्व रा. काझड), तानाजी कुंडलिक बोराटे, अंकुश मारुती शिंदे, तात्याराम वामन सांगळे (सर्व रा. बिरंगुडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

सध्या उन्हाळी हंगामाचे पाण्याचे नीरा डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे. कालव्यातून अनेक शेतकऱ्यांनी पाणी चोरण्याचा सपाटा लावला आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील शेतकऱ्यांनी नीरा डावा कालव्याच्या लासुर्णे, बोरी, भरणेवाडी हद्दीतील ६ ते ७ एप्रिलच्या दरम्यान रात्रीच्या वेळी नीरा डाव्या कालव्याचा भराव फोडून बेकायदा सायफन टाकले. याप्रकरणी कालवा निरीक्षक दिनेश ज्ञानेश्‍वर वाघ व दत्तात्रेय बाळू काळे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, तपास सहायक फौजदार शिवाजी होले, हवालदार महेंद्र फणसे, वसंत वाघोले करीत आहेत. 

Web Title: water theft 34 farmer crime