Video : पाहा वारज्यात पाणी उडतेय 50 फुट वर...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

येथील डॉ. बाबासाहेब  आंबेडकर चौक येथे वारजे जलशुद्धीकरण केंद्रापासून भालेकर वस्ती व जावळकर वस्ती  याठिकाणी जाणारी 28 इंच रुंदीची पाणीपुरवठा  करणारी पाण्याची लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

वारजे : येथील डॉ. बाबासाहेब  आंबेडकर चौक येथे वारजे जलशुद्धीकरण केंद्रापासून भालेकर वस्ती व जावळकर वस्ती  याठिकाणी जाणारी 28 इंच रुंदीची पाणीपुरवठा  करणारी पाण्याची लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

विशेष म्हणजे या पाण्यानी रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. या पाईप लाईनला असणारा एअर वॉल्वला ट्रकची जोरदार धडक बसल्याने वॉल्व तुटून पडल्याने  50 फुटाचे कारंजे उडाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, यामध्ये लाखो लिटर  पाणी वाया गेले. तर येथील रस्त्यावरील डांबर निघाले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे सहायक  अभियंता  प्रवीण  शेंडे, संतोष लांजेकर,  कल्पेश सूर्यवंशी,  अतुल धोत्रे राजू पलमाटे,  संदिप गायकवाड यांनी ताबडतोब भेट देऊन पाणीपुरवठा बंद केला. यावेळी नगरसेवक राजाभाऊ बराटे,  दत्तात्रेय चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

- मोठी बातमी : 'या' भागातील शाळा सुरु होणार? ऑनलाइन अॅडमिशनला सुरुवात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water wasted due to burst pipeline in Warja

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: