उद्योगनगरीत पाणी महागणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

उंच  भागातील नागरिकांना कमी व उताराच्या भागातील नागरिकांना जादा पाणी मिळत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता. ५) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर ठेवला आहे. 

पिंपरी - उंच  भागातील नागरिकांना कमी व उताराच्या भागातील नागरिकांना जादा पाणी मिळत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता. ५) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर ठेवला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या घरगुती वापरासाठी दरमहा सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी दिले जात आहे. सहा हजार ते २० हजार लिटरपर्यंत चार रुपये २० पैसे प्रतिहजार लिटरने तर २० हजार लिटरच्या पुढे आठ रुपये ४० पैसे प्रतिहजार लिटरसाठी पाणीपट्टी आकारणी केली जात आहे. 

प्रस्तावित दरानुसार सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी मिळेल. मात्र, सहा ते १५ हजार लिटरपर्यंत आठ रुपये, १५ ते २० हजार लिटरपर्यंत ४० रुपये आणि २० हजार लिटरच्या पुढील पाणी वापरासाठी प्रतिहजार लिटरसाठी शंभर रुपये पाणीपट्टी आकारली जाणार आहे.

मात्र, झोपडपट्टीतील नळजोडधारकांना सध्या सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी दिले जात आहे. सहा हजार ते १५ हजार लिटरपर्यंत दोन रुपये १० पैसे प्रतिहजार लिटरने तर १५ ते २० हजार लिटरसाठी तीन रुपये १५ पैसे प्रतिहजार लिटरसाठी पाणीपट्टी आकारणी केली जात आहे. 

प्रस्तावित दरानुसार सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी मिळेल. मात्र, सहा ते १५ हजार लिटरपर्यंत चार रुपये, १५ ते २० हजार लिटरपर्यंत ४० रुपये पाणीपट्टी आकारली जाणार आहे.

पाणी वापर व दर (प्रतिहजार लिटर)
    वाणिज्य (हॉटेल्स, उपाहारगृहे, दुकाने) : सध्या ५२ रुपये ५० पैसे आणि प्रस्तावित ५५ रुपये
    खासगी शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय-निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्थानके, रुग्णालये : सध्या १५ रुपये ७५ पैसे आणि प्रस्तावित १७ रुपये
    धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, महापालिका इमारती : सध्या १० रुपये ५० पैसे; प्रस्तावित दर ११ रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water will be expensive in pcmc