उजनीत उभारणार तरंगता सौर प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - उजनी धरणाच्या जलाशयावर एक हजार मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सहा जणांचा समावेश असून, या प्रकल्पाचा अभ्यास करून दोन महिन्यांत ही समिती ‘सर्वंकष प्रकल्प आराखडा’ सादर करणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प उभारण्यात येणार  असून, तो राज्यातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प असणार आहे. 

राज्यात ऊर्जेची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्यामुळे नवीन व अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विकास करण्याशिवाय पर्याय नाही; परंतु जमिनीवरील उपलब्ध नैसर्गिक स्रोतांच्या वापरावर काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. त्यामुळे राज्यात असलेल्या नद्या, समुद्र आणि धरणे यांच्या पृष्ठ भागाचा उपयोग करून तरंगते सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू होता. त्याच्याच एक भाग म्हणून उजनी जलाशयावर एक हजार मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरण कंपनीस अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महावितरणने या प्रकल्पासाठी काही कंपन्यांकडून सूचना मागविल्या होत्या. काही कंपन्यांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सर्व सूचनांचा विचार करून तसेच तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महावितरणचे वाणिज्य विभागाचे संचालक सतीश चव्हाण यांची निवड केली आहे. ही समिती या प्रकल्पाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल दोन महिन्यांत सरकारला सादर करणार आहे. 

अशा प्रकारे समिती काम करेल
प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे. 
पर्यावरण विभाग व सामाजिक घटकांकडून आवश्‍यक त्या परवानग्या मिळविणे 
पाण्याच्या पातळीत होणारा बदल याचा महिनानिहाय आलेख तयार करणे 
प्रकल्पासाठी कामकाज, कार्यपद्धती, अंमलबजावणी आदी बाबी निश्‍चिती करणे व आवश्‍यक ती कार्यवाही करणे.

Web Title: Wave Solar Plant in ujani dam