आम्हीही वॉरियर्स म्हणत जुनी सांगवीत ढोलताशा पथकाकडून रक्तदान

Blood-Donation
Blood-Donation

जुनी सांगवी - गणपती गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोल ताशा वर टिपरी फिरवणारे हात जेव्हा आम्हीही वॉरियर्स म्हणत कोविड १९ च्या काळात लॉकडाऊनमुळे कुठे रक्ताची उणीव भासू नये यासाठी जुनी सांगवी येथील सुवर्णयुग ढोलताशा पथक व सुवर्णयुग मित्र परिवाराच्या वतीने प्रशासनाचे नियम पाळत एकशे सहा जणांनी रक्तदान केले. सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनास व गरजूंना रक्तांचा तुटवडा पडू नये यासाठी एरव्ही ढोलताशावर पडणारे हात रक्तदानासाठी सरसावले. याबाबत मंडळाचे सागर खोपडे म्हणाले,या काळात मोठ्या शस्त्रक्रिया व ईतर कारणांसाठी रूग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून सामाजिक बांधिलकी जपत ढोलताशा पथकातील सदस्य व नागरीकांनी सामाजिक अंतर व योग्य ती दक्षता घेवून रक्तदान केले.

मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. 

त्याला प्रतिसाद देत सुवर्णयुग परिवाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत अनोख्या  पद्धतीने या शिबिराचे आयोजन केले होते. 

शिबीरास शतकी प्रतिसाद मिळाला स्थानिक विद्यमान आजी माजी लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग घेतला.तर आम्ही सांगवीकर म्हणत १०६ नागरिकांनी रक्तदान केले. आयोजकांनी गर्दी टाळण्यासाठी पाच पाच जणांना १५ ते २० मिनिटाच्या अंतराने बोलावून येथील शकुंतलाबाई शितोळे शाळेत रक्तदान करून घेतले.यात  सांगवी पोलिस प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. शिबिरात संकलित रक्त संजीवनी रक्तपेढी भोसरी यांना देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com