युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (बुधवार) विधानभवनात मराठीतून शपथ घेतली. यावेळी शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून अभिनंदन केले. तर गॅलरीत बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, त्यांनी देखील टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
मुंबई : ''मी विधानभवनात अनेकवेळा आलो आहे, मात्र पहिल्यांदाच इथं बोलायची संधी मिळतेय. मी जनतेचे आभार मानतो. आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,'' असे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
ठाकरे बंधुंचे होणार मनोमिलन; राज ठाकरे येणार शपथविधीला?
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (बुधवार) विधानभवनात मराठीतून शपथ घेतली. यावेळी शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून अभिनंदन केले. तर गॅलरीत बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, त्यांनी देखील टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
Aaditya Thackeray,Shiv Sena: We are committed to making a new Maharashtra. There are several first time MLAs and we all felt proud while taking oath. Want to serve the people of the state pic.twitter.com/1zBNLvaAOe
— ANI (@ANI) November 27, 2019
विधानभवानाबाहेर आलेल्या आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की, ''आज शपथ घेत असताना पाहिलं की प्रत्यक पक्षात तरुण आमदार मोठ्या प्रमाणात आहेत. मंत्रिमंडळ हे सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे ठरवतील. आम्ही फक्त काम करत राहणार. आज खुपच आनंद झाला आहे. रोहित पवार, ऋतुराज पाटील या माझ्या तरूण मित्रांसोबत काम करताना अनुभव खूप चांगला असेल. आम्ही एकत्र येऊन हे काम सुरु करत आहोत, यासाठी तुमचीही गरज आहे. आपले आशीर्वाद सहकार्य असेच राहू द्या.''
मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, शपथ घेतो की...
उद्धव ठाकरेंसह 9 मंत्री घेणार शपथ; सोनियांसह 'हे' दिग्गज राहणार...