बारामतीत पवारांचा पराभव शक्य नाही; चंद्रकांत पाटलांची कबुली (व्हिडिओ)

Chandrakant Patil
Chandrakant Patil

बारामती शहर : येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये अजित पवार यांना पराभूत करणं हा आशावाद ठरेल, मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही नक्की विजय मिळवू असे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव करणे शक्य नसल्याची एक प्रकारे कबुली आज बारामती दिली.

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती जिंकणार असा दावा मी कधीच केला नव्हता कारण बारामतीमध्ये अजितदादांनी केलेली विकास कामे पाहता त्यांना बारामतीत पराभूत करणे हा आशावाद ठरेल. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघावर निश्चितपणे वर्चस्व गाजवू असे पाटील म्हणाले.

मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी आहे त्यामुळे मी हे खुलेपणाने मान्य करतो, असे सांगत या माझ्या विधानामुळे अजित दादांनाही निश्चित बरं वाटेल अशी पुस्तीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जोडली.दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेना निम्म्या निम्म्या जागा लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नितेश राणे यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर केलेली चिखलफेक योग्य नसून कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये ,असे आपण नारायण राणे यांना सांगितले असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. नारायण राणे यांचा मला फोन आला होता त्यावेळी नारायण राणे यांनाही मी ही कामे चर्चेने आपण सोडवू शकतो यामध्ये कायदा हातात घेण्याची गरज नव्हती असे सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com