#WeCareForPune हडपसरवासीयांचा प्रश्‍न सोडविण्याचा निर्धार

हडपसर - ‘सकाळ संवाद’ या उपक्रमांतर्गत आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित असलेले सजग नागरिक.
हडपसर - ‘सकाळ संवाद’ या उपक्रमांतर्गत आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित असलेले सजग नागरिक.

पुणे - मगरपट्टा सिटी, अमनोरा पार्कसारखे भव्य गृहप्रकल्प, नामांकित आयटी कंपन्यांचे टॉवर, झपाट्याने विकसित होणाऱ्या हडपसरच्या समस्यांतसुद्धा वेगाने वाढ होताना दिसत आहे. त्या सोडविण्यासाठी प्रशासनाची उदासीनता याविषयी परिसरातील सजग नागरिक ‘सकाळ माध्यम समूहा’च्या मंचावर एकत्रित आले. निमित्त होते ‘सकाळ संवाद’च्या #WeCareForPune उपक्रमाचे.

रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात नागरिकांनी परिसरातील समस्या तर मांडल्याच; परंतु त्या सोडविण्यासाठीही प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अनेक प्रश्न ‘सकाळ’मुळेच मार्गी लागल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
‘सकाळ’च्या विविध उपक्रमांची माहिती देऊन ‘सकाळ संवाद’च्या नवीन मोबाईल ॲपद्वारे नागरी समस्या मांडण्याचे आवाहन करीत ‘सकाळ’चे उपसंपादक संजय नवले यांनी वाचकांशी संवाद साधला. 

दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी केवळ प्रशासनावरच अवलंबून न राहता त्याचे निराकरण करण्यासाठी  सजग नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याने ‘सकाळ’ने हा उपक्रम सुरू केला आहे. 

विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, मंडळांचे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिकांच्या सभासदांसह वेळोवेळी समस्यांविषयी आवाज उठविणाऱ्या ‘सकाळ’च्या सजग वाचकांनी यात सहभाग घेऊन विविध समस्या मांडल्या व त्या सोडविण्यासाठी उपाययोजनांविषयी विचारविनिमय केला. ‘सकाळ’चे उपसंपादक मंगेश महाले यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन संदीप जगदाळे व वितरण विभागाचे सुनील गाडेकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com