Vidhan Sabha 2019 : मतदारसंघातील वाहतूक गतिमान, स्मार्ट करण्यासाठी प्राधान्य दिले : तापकीर

Vidhan Sabha 2019 : मतदारसंघातील वाहतूक गतिमान, स्मार्ट करण्यासाठी प्राधान्य दिले : तापकीर

वारजे माळवाडी : मतदारसंघातील नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने दळणवळणाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मी गेली पाच वर्षे प्रयत्न केले. चांदनी चौकातील प्रकल्प, सिंहगड घाट रस्त्यात दरड संरक्षणासाठी जाळ्या बसविल्या. आंबी,  निळकंठेश्वरच्या रस्त्यासाठी जास्तीचा निधी आणून मतदारसंघातील वाहतूक गतिमान आणि स्मार्ट करण्यासाठी प्राधान्य दिले. असे भीमराव तापकीर यांनी दिले.

नुकताच त्यांनी शिवणे उत्तमनगर परिसरात दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते. अरुण दांगट, सचिन दांगट, सुभाष नानेकर, उमेश सरपाटिल, निखिल धावडे, अभिजित धावडे, उषा नानेकर, ममता दांगट, मनीषा मोरे, भगवान मोरे, संतोष शेलार, अंकुश पायगुडे, प्रकाश साळवे, कुंडलिक धावडे, सचिन कांबळे, मंगेश मोरे, सुनीता मोरे, महादेव येणपुरे, गणेश दांगट, मंगेश पवार, सागर शिर्के, नितु धावडे यावेळी उपस्थित होते. 

केंद्र, राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातून चांदणी चौकातील कामासाठी 625 कोटी रुपये मंजूर झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वारजे येथील मंगेशकर रुग्णालय समोरील व खेड शिवापूर येथील फाट्याजवळ पुल विक्रमी वेळेत तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. नांदेड फाटा कालव्याचा अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडी होत होती. पाच कोटी खर्च करून दोन कालव्यावर चार पुल तयार करून वाहतूक कोंडी सोडविली.

शिवणे- कोंढवे धावडे येथे अरुंद रस्त्याने वाहतूक कोंडी असायची. येथील अतिक्रमणे काढून रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटकरण्यासाठी नऊ कोटी 70 लाख रुपये खर्च झाला. हे काम 95 टक्के पूर्ण झाले असून ते येथील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. कोंढवे-धावडे येथील भीमनगर व कुंजाईच्या ओढ्यावर दोन पुलांच्या रुंदीकरणासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याचे भूमिपूजन झाले आहे. 

पर्यटनाला चालना  देण्यासाठी राज्याच्या हायब्रीड ऍन्यूटीतुन 10 वर्ष देखभालीसह नांदेड ते वेल्हे, खानापूर ते पानशेत आणि कोंढणपूर ते खेड शिवापुर या रस्त्यासाठी 202 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. नांदेड ते  डोणजे हा काँक्रिट रस्ता आहे. नांदेड ते खडकवासला हा चार पदरी रस्ता आहे. दर शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी होत आहे. या रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे.

खडकवासला धरणातून सहा हजार क्यूसेकपेक्षा पाणी सोडल्यानंतर मुठा नदीवरील शिवणे नांदेड पूल पाण्याखाली जातो. हा पूल अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. हे काम प्रस्तावित आहे. 

वडगाव बुद्रुक नवले ब्रीजपासून कात्रजपर्यत आणि मुख्य कात्रज चौकातील वाहतूक कोंडी आहे. यासाठी वडगाव ते कात्रज रस्ता सहापदरी रस्ता आणि सुशोभीकरण करण्यासाठी 126.69 कोटी रुपये मंजूर झाले असून  टेंडर प्रक्रिया सुरू आहे.

कात्रज चौकात वंडरसिटी ते राजस सोसायटीदरम्यान आता सहापदरी उड्डाणपुलासाठी 97.66 कोटी रुपये मंजूर आहे. यामुळे पुण्याचे दक्षिण प्रवेशद्वार कोंडी मुक्त होईल, असा विश्वास तापकीर यांनी व्यक्त केला. 

स्वारगेट ते कात्रज, डेक्कन ते खडकवासला आणि कात्रज ते चांदनी चौक या मेट्रो मार्गासाठी आग्रही असून स्वारगेट ते कात्रजसाठी तीन हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com