भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार - भालचंद्र कांगो 

मिलिंद संगई
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र कांगो यांनी दिली.

बारामतीतील कामगार मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील पालघर, दिंडोरी, परभणी, गडचिरोली या जागांवर डाव्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याची आमची मागणी आहे, मात्र काहीही झाले तरी आम्ही भाजपविरोधी भूमिकेतूनच काम करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

गेल्या पाच वर्षांच्या काळात कामगारविरोधी धोरणच राबविण्याचे काम केंद्र व राज्य शासनाने कायमच केले, कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका न घेता मालकधार्जिणी भूमिकाच सरकारने सातत्याने घेतली. अब्जाधिशांची संख्या 118 वर जाऊन पोहोचली तर सामान्यांच्या प्रगतीच्या आकडेवारीत भारत 130 व्या क्रमांकावर गेला आहे. 

पुणे विभागात 228 कंपन्यात केलेल्या सर्वेक्षणात 1 लाख 66 कामगारांपैकी फक्त 26 हजार कामगार कायमस्वरुपी होते, उर्वरित सर्व कंत्राटी किंवा हंगामी स्वरुपाचे असल्याचे आढळले. या सर्वांचे भवितव्य अंधकारमय आहे. कामगारांना किमान अठरा हजार रुपये वेतन द्यावे, बारा तासांचे काम आठ तासांवर आणावे, नवीन नोक-या निर्माण करण्यास पूरक धोरण आखावे अशा मागण्या कांगो यांनी केल्या. 

संघटीत व असंघटीत असे जवळपास 44 कोटी कामगार या देशात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. या सर्वांनी सरकार खाली खेचायचे ठरविल्यास काहीही अवघड नसून आता आगामी निवडणूकीत या कामगारांचीच जबाबदारी मोठी असल्याचेही कांगो यांनी सांगितले. भाजपविरोधी भूमिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासोबतच आम्ही सक्रीयपणे असू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: We will openly participate in the campaign against BJP - Bhalchandra Congo