Three Wealth Planet Officials Convicted for Investor Fraud
sakal
पुणे : कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत ठेवीदारांच्या रकमेचा अपहार करून त्यांचा विश्वासघात केल्याप्रकरणी 'वेल्थ प्लॅनेट कंपनी'च्या तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांनी हा निकाल दिला.