लोणावळा : राहुल शेट्टी हत्याप्रकरणातील हल्लेखोराकडून शस्त्रे हस्तगत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

लोणावळा शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी (वय ३८) यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला हल्लेखोर इब्राहिम युसुफ खान (वय ३०, रा. सैय्यदनगर, हडपसर, मूळ रा. लातूर) याच्याकडून गुन्हात वापरण्यात आलेली शस्त्र हस्तगत करण्यात आल्याची माहीती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.  यामध्ये देशी बनावटीचे पिस्तूल, वीस जिवंत काडतुसे, तीन कोयते, एक सुरा, हत्यारांना धार लावण्याचा दगड, स्क्रू ड्रायव्हर, काणस यांचा समावेश आहे.  याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हेल्मेट व अंगात घातलेले जर्किंग जप्त करण्यात आले आहे.

लोणावळा - शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी (वय ३८) यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला हल्लेखोर इब्राहिम युसुफ खान (वय ३०, रा. सैय्यदनगर, हडपसर, मूळ रा. लातूर) याच्याकडून गुन्हात वापरण्यात आलेली शस्त्र हस्तगत करण्यात आल्याची माहीती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.  यामध्ये देशी बनावटीचे पिस्तूल, वीस जिवंत काडतुसे, तीन कोयते, एक सुरा, हत्यारांना धार लावण्याचा दगड, स्क्रू ड्रायव्हर, काणस यांचा समावेश आहे.  याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हेल्मेट व अंगात घातलेले जर्किंग जप्त करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणावळ्यातील न्यू तुंगार्ली येथील एका बंगल्यातून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात  आला आहे. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राहुल शेट्टी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर डोक्यात गोळ्या घालत व कुऱ्हाडीने वार करत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करत सुरज आगरवाल व दीपाली भिलारे यांना अटक केली होती. पोलिस हल्लेखोराच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी मुख्य हल्लेखोर व त्यास मदत करणारा साथीदार मोहन ऊर्फ थापा देवबहाद्दर मल्ला यास पुण्यातून अटक केली होती. याप्रकरणी तीन जण अद्याप फरार आहेत.

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 121 जणांना डिस्चार्ज 

हत्या करणारा हल्लेखोर इब्राहिम खान याने हत्येनंतर न्यू तुंगार्लीतील लपलेल्या बंगल्यातून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल, जिवंत काडतुसे व कोयते जप्त केले. सदर हत्येमागील मुख्य सुत्रधार, हत्येचे कारणांचा पोलिस तपास करत असून आरोपींना शस्त्रसाठा कोणी पुरवली, राहण्यासाठी बंगला कोणी दिला याचाही पोलिस शोध घेत आहेत, असे मनोजकुमार यादव म्हणाले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weapons seized from Attacker in Rahul Shetty murder case in lonavala