घराबाहेर पडताना मास्क हवाच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

‘बाळाला लसीकरणाला घेऊन जाताना रस्त्यावर दिसणारे चित्र पाहुन धक्काच बसतो. जवळपास प्रत्येक १० जणांपैकी तीन जण मास्कशिवाय फिरत असल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर, परिस्थिती अधिक गंभीर होत असताना अनेक जण मास्क हनुवटीभोवती ठेवून वावरत आहेत. हे पाहून मनात अनेक शंका येतात,’ अश्विनी खांडके या आपल्या तीन महिन्यांच्या बाळाविषयी काळजी व्यक्त करत सांगत होत्या.

पुणे - ‘बाळाला लसीकरणाला घेऊन जाताना रस्त्यावर दिसणारे चित्र पाहुन धक्काच बसतो. जवळपास प्रत्येक १० जणांपैकी तीन जण मास्कशिवाय फिरत असल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर, परिस्थिती अधिक गंभीर होत असताना अनेक जण मास्क हनुवटीभोवती ठेवून वावरत आहेत. हे पाहून मनात अनेक शंका येतात,’ अश्विनी खांडके या आपल्या तीन महिन्यांच्या बाळाविषयी काळजी व्यक्त करत सांगत होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी कंपनीत काम करणाऱ्या अश्विनी सध्या गरोदरपणाच्या सुटीवर आहेत. बाळ लहान असल्याने त्या घराबाहेर पडत नाहीत. पण लसीकरणासाठी त्या बाळाला घेऊन घराबाहेर पडतात. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रत्येकाने मास्क घेतलाच पाहिजे, असे आग्रही मत अश्विनी यांनी व्यक्त केले. त्यांच्याप्रमाणे जवळपास ८८ टक्के नागरिकांना मास्क अनिवार्य आहे, 
असे वाटते.

सावधान! कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना

देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये मास्क घालणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकल सर्कल्स’च्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, वेळ पडलीच तर दंडात वाढ करावी, असे उपाय नागरिकांनी सुचविले आहेत.

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण

प्रत्येकाने मास्क घालयला हवा. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मास्क घातल्यास कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल. मास्क न घातल्यास कोणतीही शिक्षा करावी, याचे समर्थन मी करत नाही. पण काही नागरिक मास्क घालत नसतील, तर त्यांना आरोग्य केंद्रात स्वंयसेवक म्हणून काही दिवस काम दिले पाहिजे.
- श्वेता चौधरी, मानसिक समुपदेशक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wear a mask when you go out