Monsoon Rain Update : यंदा चांगला पाऊस होणार? जून महिन्यापासून ‘ला-निना’चे संकेत; मॉन्सूनच्या पावसासाठी सकारात्मक बाब

Monsoon Rain Update : मॉन्सून हंगामाच्या सुरवातीपासूनच (जून ते ऑगस्ट) ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता वाढली आहे.
Weather Update early monsoon rain likely as La Nina set to return marathi news
Weather Update early monsoon rain likely as La Nina set to return marathi news


पुणे : प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’चा प्रभाव कमी होऊ लागला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीवर (न्यूट्रल) येण्याचे संकेत आहेत. तर मॉन्सून हंगामाच्या सुरवातीपासूनच (जून ते ऑगस्ट) ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता वाढली आहे. ही स्थिती मॉन्सून हंगामातील पावसासाठी पूरक मानली जात आहे.

अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अॅण्ड एटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) ‘एल निनो’ स्थितीचा अहवाल गुरुवारी (ता. ११) जाहीर केला. या अहवालानुसार मार्च महिन्यात विषुववृत्तीय प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानात कमी होत असल्याचे दिसून आले आहे. पूर्व प्रशांत महासागरात हे तापमान सर्वात कमी झाले आहे. एकत्रित महासागर वातावरणीय प्रणालीनुसार (कपल्ड ओशन अॅटमॉस्फेअर सिस्टिम) एल-निनो कमकुवत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Weather Update early monsoon rain likely as La Nina set to return marathi news
Modi on Constitution: "खुद्द बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान संपवू शकत नाहीत"; PM मोदींचं विरोधकांना उत्तर

यातच आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या (आयआरआय) अहवालानुसार, उन्हाळा हंगामातच ‘एल-निनो’ स्थिती निवळून प्रशांत महासागरातील तापमान सर्वसाधारण स्थितीमध्ये संक्रमण होणार आहे. तसेच उन्हाळ्याच्या उत्तरार्धात ‘ला-निना’ स्थिती विकसित होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ‘एल-निनो’ स्थिती निवळून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान त्याच्या सामान्य पातळीवर म्हणजेच न्यूट्रल (सरासरी तापमानाच्या ०.५ अंश सेल्सिअस कमी- अधिक ) येण्याची शक्यता ८५ टक्के आहे. तर जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘ला-निना’ स्थिती विकसित होण्याची शक्यता ६० टक्के असल्याचे ‘नोआ’ या अमेरिकी हवामान संस्थेने स्पष्ट केले आहे.  

Weather Update early monsoon rain likely as La Nina set to return marathi news
Lok Sabha Election 2024 : ''डायनासोर'प्रमाणे काँग्रेस नष्ट होत चालला आहे'', राजनाथ सिंह यांचा घणाघात; म्हणाले...

....असा होतो मॉन्सूनवर परिणाम


विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सलग तीन महिने सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेल्यास त्या स्थितीला ‘एल निनो’; तर सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले गेल्यास त्या स्थितीला ‘ला निना’ म्हटले जाते. प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती सक्रिय असताना भारतात मॉन्सून काळात बहुतेक वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो; तर ‘ला निना’च्या स्थिती दरम्यान बहुतेक वर्षी भारतात मॉन्सून काळात सर्वसाधारण किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो, असे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com