आभाळ दाटलं, पाऊस केंव्हा पडणार

मॉन्सूनच्या सक्रीयतेची प्रतिक्षाच; शहरात हलक्या पावसाची शक्यता
weather update maharashtra possibility of Rain farmer awaiting for monsson Arabian Sea
weather update maharashtra possibility of Rain farmer awaiting for monsson Arabian Seasakal

पुणे : अरबी समुद्रावर तयार झालेल्या बाष्पाच्या ढगांमुळे राज्यात मॉन्सून सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहे. मात्र प्रत्यक्ष पाऊस केंव्हा पडेल, याची चिंता आता बळीराजाला लागली आहे. मॉन्सूनने जवळपास संपूर्ण राज्यच व्यापले पण पाऊस नाही. आता रविवारी (ता.१९) मॉन्सून सक्रिय होईल, या हवामान विभागाच्या भाकितावर सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात आकाश सामान्यतः ढगाळ होते. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.

शनिवार (ता.१८) नंतर मॉन्सून सक्रिय होत प्रथम कोकण, नंतर मध्य महाराष्ट्र आणि त्यानंतर उर्वरित राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे शहर व परिसरात आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

म्हणजे मॉन्सून सक्रिय होणे...

मॉन्सून सक्रिय होण्यासाठी समुद्रावरून बाष्पाचे पुरवठा होणे, हे बाष्पयुक्त वारे जमिनीवर फेकले जाण्यासाठी चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती, कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा अर्थात द्रोणीय स्थिती, जमिनीवरील कमी दाबाचे पट्टे आदी वातावरणीय घटकांची आवश्यकता असते. मॉन्सून सर्व देशभरात दाखल झाल्यानंतर उत्तरेकडे तयार होणाऱ्या ‘मॉन्सून ट्रफ’ म्हणजेच मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची स्थिती यावर मॉन्सूनची सक्रियता अवलंबून असते. सध्या एकतर या स्थिती तयार झालेल्या नाहीत किंवा आहेत त्या पावसासाठी पुरेशा नाहीत. यामुळे पाऊस पडत नाही. आता पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com