Weather Update : पुणे जिल्ह्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट; राज्यात अशी असेल स्थिती

काल सर्वाधिक पावसाची नोंद मगरपट्टा येथे २.५ मिलीमीटर झाली तर सर्वाधिक तापमान चिंचवड येथे ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
weather update maharashtra pune yellow alert rain forecast
weather update maharashtra pune yellow alert rain forecast sakal
Summary

काल सर्वाधिक पावसाची नोंद मगरपट्टा येथे २.५ मिलीमीटर झाली तर सर्वाधिक तापमान चिंचवड येथे ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुणे : शहरासह पुणे जिल्ह्यातच पुढील चार दिवस कमाल तापमानात फारशी वाढ नसली, तरी अवकाळी पावसाच्या दृष्टीने हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे दूपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

बुधवारी सकाळपासूनच पुणे शहरात आकाश ढगाळ होते. तर दुपारी चार नंतर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. काल सर्वाधिक पावसाची नोंद मगरपट्टा येथे २.५ मिलीमीटर झाली तर सर्वाधिक तापमान चिंचवड येथे ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. रविवार (ता.७) नंतर शहरातील कमाल तापमानात वाढ होईल, तसेच अवकाळी पावसाची शक्यता कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यातीलही कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. गुरूवारी (ता. ४) राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नैर्ऋत्य मध्य प्रदेशापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू परिसरासह दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

बंगालच्या उपसागराच्या अग्नेय भागात शनिवारपर्यंत (ता. ६) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे या भागात रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहेत. या प्रणालीची तीव्रता वाढून उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. ही वादळी प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com