पुणे : पाणी कपात आठवडाभरच

खडकवासला धरण प्रकल्पातून अडीच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. जून महिना संपला तरी धरण क्षेत्रात मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे
weather update Pune municipal corporation Water cut for a week it can be change if water accumulates in dam
weather update Pune municipal corporation Water cut for a week it can be change if water accumulates in dam esakal

पुणे : खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणे शहरात सोमवारपासून (ता.४) एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. मात्र येत्या ही कपात ११ जुलै पर्यंतच ठेवली आहे. तोपर्यंत धरणात पुरेसे पाणी जमा झाल्यास पाणी कपात रद्द केली जाईल. अन्यथा ११ जुलै नंतरही कपात कायम ठेवण्याचा निर्णय महापालिकेकडून घेतला जाऊ शकतो. खडकवासला धरण प्रकल्पातून अडीच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. जून महिना संपला तरी धरण क्षेत्रात मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने पाणी कपात करण्याची तयारी सुरू केली.

गेले तीन ते चार दिवसांपासून प्रत्येक विभागानुसार पाण्याचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू होते. हे काम अंतिम केल्याने त्याचे वेळापत्रक आज (ता.१) महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

पाणीपुरवठाच्या वेळात बदल नाही

महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामध्ये केवळ एक पाणी येणार नाही. पण ज्या दिवशी पाणी पुरवठा होईल तेव्हा गेले वर्षभर ज्या वेळेला पाणी येत होते त्याच वेळेला आताही पाणीपुरवठा केला जाईल. पाण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही साधारणपणे सर्व भागात चार तास पाणी मिळेल असे नियोजन महापालिकेने केलेले आहे.

३४ गावांना दिलासा

पुणे शहराच्या जुन्या हद्दीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२२ मध्ये समाविष्ट झालेली २३ गावे येथे महापालिकेची पाणीपुरवठा पुरवठ्याची यंत्रणा उपलब्ध नाही. ग्रामपंचायतची उपलब्ध यंत्रणा तसेच टँकरद्वारे या भागात पाणीपुरवठा केला जात आहे. आधीच या भागात पाण्याची टंचाई असल्याने तेथे पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या ठिकाणी वेळापत्रक

महापालिकेने १०५ विभागात शहरातील पाणी पुरवछ्याचे नियोजन केले आहे. याचे वेळापत्रक महापालिकेच्या https://www.pmc.gov.in/sites/default/files/water_supply_timetable.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

"सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा शहरात केला जाणार आहे. त्याचे वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. ११ जुलै पर्यंत ही कपात लागू असणार असून तोपर्यंत धरण क्षेत्रात पाऊस पडून पाणीसाठा जमा झाल्यास पाणी कपात मागे घेतली जाईल. पुरेसा पाणीसाठा जमा न झाल्यास पुढील नियोजन महापालिकेतर्फे कळविण्यात येईल. "

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com